24 November 2024 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

शिंदे है तो मुमकिन है? शिंदे राजवटीत कर्नाटक भाजपचा आत्मविश्वास वाढला, सांगलीतील 40 गावं कर्नाटकात घेण्याचा हालचाली

Maharashtra Karnataka border

Sangli 40 Villages in Jat Taluka | सांगलीच्या जत तालुक्यातील ४० दुष्काळग्रस्त गावांनी नुकताच कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने ही गावे आपल्या राज्यात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्याचे दिसत आहे. यासंदर्भात कर्नाटकच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले की, जत तालुक्यात दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई आहे. आम्ही या गावांना पाणी देऊन मदत केली आहे. आता या ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील भूभागावर वक्रदृष्टी
कर्नाटक सरकार या ठरावाचा गांभीर्याने विचार करत आहे, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकची महाराष्ट्रातील भूभागावर वक्रदृष्टी असल्याची चर्चा रंगली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महाराष्ट्र आणि कर्नाटकांच्या राज्यपालांदरम्यान समन्वय साधण्यासाठी बैठक झाली होती. एका बाजूला हे सकारात्मक प्रयत्न सुरु असताना कर्नाटक सरकारकडून हा वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जत तालुक्यातल्या या ग्रामपंचायतींनी सुविधा मिळत नसल्याने कर्नाटक राज्यात समावेश करा, असा प्रस्ताव मांडला होता आणि तो मंजूर करण्यात आला होता, असा दावा बोम्मई यांनी केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात भाजपच्या मदतीने शिंदे सरकार सत्तेत असल्याने कर्नाटक भाजप सरकारचा आत्मविश्वास दुणावल्याचं पाहायला मिळतंय आणि परिणामी या ठरावांचा कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर नुकतीच एक बैठक झाली. सीमेवरील नागरिकांच्या पाठिशी राज्य सरकार असून कायदेशीर लढाई लढली जाईल. यातील न्यायप्रक्रियेच्या समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देईस या दोन मंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय भूमिका असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Karnataka border issue raised in Sangli check details on 23 November 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra Karnataka border(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x