24 November 2024 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Investment Tips | सरकारी योजनेत नो टेन्शन, ही योजना 44 रुपये जमा करून देईल 27 लाख परतावा, स्कीम डिटेल वाचा

Investment Tips

Investment Tips | ज्या लोकांना एलआयसीमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. एलआयसी कंपनी वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त परतावा देणारी योजना लाँच करत असते. सध्या LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, तिचे नाव आहे, “एलआयसी जीवन उमंग पॉलिसी”. या पॉलिसी मध्ये तुम्ही गुंतवणूक करून प्रचंड मोठा परतावा मिळवून शकता. या योजनेचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊ एलआयसी जीवन उमंग पॉलिसीचे सविस्तर फायदे.

LIC जीवन उमंग पॉलिसी :
LIC जीवन उमंग पॉलिसीचे अनेक फायदे आहेत. ही जीवन विमा योजना LIC च्या इतर सर्व योजनांपेक्षा अनेक बाबतीत भिन्न आहे. या पॉलिसी मध्ये 90 दिवसांपासून ते 55 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकता. अल्पवयीन मुलांच्या वतीने पालक या पॉलिसीमध्ये पैसे लावू शकता. LIC जीवन उमंग पॉलिसी ही एक एंडॉवमेंट योजना आहे. यामध्ये, लाइफ इन्शुरन्स कव्हरसह, मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम दिली जाते. योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर दर वर्षी तुमच्या खात्यात ठराविक रक्कम जमा केली जाते. दुसरीकडे, जर समजा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि नॉमिनीला पॉलिसीची एकरकमी रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाते. या योजनेचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत तुम्हाला 100 वर्षांपर्यंत कव्हरेज प्रदान केले जाईल.

27.60 लाख परतावा :
या पॉलिसीमध्ये तुम्ही दरमहा 1302 रुपये प्रीमियम जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. एका वर्षात तुम्हाला 15,298 रुपये पॉलिसीचा हफ्ता पडेल. पॉलिसीच्या खास बाबी
* जर तुम्ही LIC जीवन उमंग पॉलिसीमध्ये 30 वर्षांसाठी गंतवणुक केली तर चालवली तर तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 4.58 लाख रुपये जमा होईल.
* तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर LIC तुम्हाला 31 व्या वर्षापासून वार्षिक 40000 परतावा देईल.
* जर तुमच्या वयाच्या 100 वर्षांपर्यंत तुम्हाला वार्षिक 40000 परतावा भेटला तर तुम्हाला एकूण 27.60 लाख रुपये परतावा मिळेल.

टर्म रायडरला मिळणारा फायदा :
* या पॉलिसी अंतर्गत गुंतवणूकदारांना आणखी एक मोठा फायदा मिळतो, तो म्हणजे एखाद्या अपघातात गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व आले तर, पॉलिसी धारकाला टर्म रायडर बेनिफिट दिले जाते.
* एवढेच नाही ही योजना बाजारातील जोखीमीच्या अधीन नाही, त्यामुळे बाजारातील चढ उताराचा या योजनेतील गुंतवणुकीवर परिणाम होत नाही.
* एक गोष्ट लक्ष्य ठेवा की, एलआयसीच्या नफा-तोट्याचा या पॉलिसीवर नक्कीच परिणाम होतो.
* आयकर कलम 80C अंतर्गत या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सवलत दिली जाते.
* जर तुम्हाला जीवन उमंग पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला किमान दोन लाख रुपयांची विमा पॉलिसी घ्यावी लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips of LIC Jeevan Umang policy for Next Hundred year benefits on 27 November 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x