24 November 2024 9:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

सुप्रीम कोर्टात 29 ला सुनावणी, 50 आमदार आणि 12 खासदारांसाठी गुवाहाटी 5 स्टार हॉटेलात 100 खोल्या बूक, खोके पुन्हा चर्चेत

CM Eknath Shinde

Shinde Camp in Guwahati | महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगासंदर्भात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने वकिलांना या खटल्याचे लेखी स्वरूपात संकलन पूर्ण करण्यास सांगितले आणि चार आठवड्यांत मुख्य मुद्दे विचारात घेऊन ते लेखी स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सर्वाधिक धाकधूक शिंदे गटाची झाल्याची बातमी आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगासंदर्भात शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक केंद्रित असलेली असलेली १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका चर्चेचा विषय बनली आहे. त्याच मुख्य कारण असं म्हटलं जातंय की त्यात घटनेतील तरतुदींवर जोर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्य न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड हे घटनात्मक विषयांबाबत अत्यंत कठोर निर्णय घेण्यात सर्वश्रुत असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका महत्वाची यासाठी आहे कारण त्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. हा निर्णय शिंदे सरकारच्या विरोधात गेल्यास काय यावर अंदाज व्यक्त करून त्यासंबधित राजकीय हालचाली आणि अप्रत्यक्ष राजकीय टिपण्या सुरु झाल्या आहेत.

२९ नोव्हेंबरला सुनावणी आणि त्यापूर्वीच शिंदे गट गुवाहाटीला का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या 50 आमदार आणि १२ खासदारंसह पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत असं वृत्त आहे. 26 नोव्हेंबरला संध्याकाळी मुंबईतून विशेष विमानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र तिकडे गेल्यावर दौरा पुन्हा वाढवला जाणार का? म्हणजे २९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे आणि त्यात शिंदे गटाविरोधात काही निर्णय आल्यास इतर आमदार फुटू नयेत यासाठी भाजप विशेष काळजी घेत असल्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही बाजूने राज्यात मध्यावधी निवडणुकाचे दावे सुरु झाल्याने याविषयावर चर्चा जोर धरू लागली आहे.

उद्या संध्याकाळी सर्व आमदार, खासदार आणि मंत्री हे सर्वजण रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये उतरणार आहेत. या हॉटेलातील 100 खोल्या बूक करण्यात आल्या आहेत. या हॉटेलपासून कामाख्या देवीचं मंदिर 20 मिनिटावर आहे. रविवारी सकाळी सर्वजण या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेणार आहेत. 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी परत मुंबईला येऊ असं सांगण्यात आलं असलं तरी यामागे सुप्रीम कोर्टातील सुनावणीशी थेट संबंध असल्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. तिकडे भाजपचे दिल्लीतील कोणी वरिष्ठ नेते त्यांच्या भेटी घेणार का यावर सुद्धा चर्चा सुरु झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Camp MLA and MP will move to Guwahati before hearing in supreme court check details on 25 November 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x