21 November 2024 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

SBI Mutual Fund | पैसा हवाय? SBI च्या टॉप 5 SIP योजना करोडपती बनवत आहेत, लिस्ट सेव्ह करा आणि पैसे वाढवा

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंड ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी मालमत्ता व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. या फंड हाऊसमध्ये अशा अनेक म्युचुअल फंड योजनाचा समावेश होतो, ज्या 20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून चालू आहेत. SBI म्युच्युअल फंड आता आपल्या ग्राहकांना इक्विटी फंडांव्यतिरिक्त डेट फंडमध्ये ही गुंतवणुक करण्याची संधी देत आहेत. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI द्वारे SBI म्युचुअल फंड योजना बाजारात चालू आहेत. SBI म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केल्यास या योजनांमध्ये मजबूत कमाई करत येते. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही म्युचुअल फंड योजनांची माहिती देणार आहोत जे मागील 20 वर्षांपासून बाजारात कार्यरत आहेत. केवळ 5000 रुपये दरमहा एसआयपी गुंतवणुकीवर 1.40 कोटी रुपये परतावा सहज कमावता येऊ शकतो. SBI म्युच्युअल फंडाच्या या 5 योजना मासिक 5000 रुपये जमा करणाऱ्या लोकांना करोडपती बनवतील हे नक्की.

1) एसबीआय मॅग्नम ग्लोबल फंड :
एसबीआय मॅग्नम ग्लोबल म्युचुअल फंडचे मध्ये एसआयपी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मागील 20 वर्षांत 21 टक्के परतावा मिळाला आहे. या दरम्यान 5000 रुपयांच्या मासिक SIP चे गुंतवणूक मूल्य वाढून 1.40 कोटी रुपयेपेक्षा अधिक झाले आहे. ज्या लोकांनी योजनेत एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांना आतापर्यंत 72 पट अधिक परतावा मिळाला आहे.

2) SBI Consumption Opportunity Fund :
SBI Consumption Opportunity Fund ने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के CAGR दराने परतावा कमावून दिला आहे. या दरम्यान ज्या लोकांनी या योजनेत 5000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1.20 कोटी रुपयेपेक्षा जास्त झाले आहे. ज्या लोकांनी या म्युचुअल फंडात एकरकमी गुंतवणूक केली होती, त्या लोकांनी आता सुमारे 42.5 टक्के अधिक परतावा कमावला आहे.

3) SBI लार्ज आणि मिडकॅप फंड :
SBI लार्ज अँड मिडकॅप म्युचुअल फंडाने मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 19.75 टक्के CAGR दराने परतावा कमावून दिला आहे. यादरम्यान.ज्या लोकांनी या योजनेत 5000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1.20 कोटी रुपये झाले आहे. ज्या लोकांनी म्युचुअल फंडमध्ये एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांनी आता 54 पट अधिक परतावा कमावला आहे.

4) SBI लाँग टर्म इक्विटी फंड :
SBI लाँग टर्म इक्विटी म्युचुअल फंडाने SIP गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मागील 20 वर्षात 19.43 टक्के CAGR दराने परतावा कमावून दिला आहेत. या दरम्यान 5000 रुपये मासिक SIP जमा करणाऱ्या लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.15 कोटी रुपये वाढले आहेत. ज्या लोकांनी या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी गुंतवणूक केली होती त्यांनी या योजनेच्या माध्यमातून 62 टक्के अधिक परतावा कमावला आहे.

5) एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज :
एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज म्युचुअल फंडाने एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मागील 20 वर्षांत 19.38 टक्के सीएजीआर दराने परतावा कमावून दिला आहे. या दरम्यान 5000 रुपये मासिक एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य वाढून आगा 1.12 कोटी रुपयेपेक्षा अधिक झाले आहे. ज्या लोकांनी या योजनेत एकरकमी गुंतवणूक केली होती त्यांनी आता 37 पट अधिक परतावा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Top 5 SBI Mutual Fund scheme for amazing returns on SIP Investment on 05 March 2023.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(139)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x