23 November 2024 5:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Unipart India IPO | पैसे तयार ठेवा! धमाकेदार IPO बाजारात येण्यास सज्ज, शेअरची किंमत आणि कंपनी डिटेल्स तपासा

Unipart India IPO

Unipart India IPO | जर तुम्ही सध्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट बातमी घेऊन आलो आहोत. वास्तविक अभियांत्रिकी प्रणाली आणि सोलुशन प्रदान करणारी Uniparts India कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. Uniparts India कंपनीचा IPO पुढील आठवड्यात बुधवारी दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात येईल. या कंपनीने आपल्या IPO साठी प्रति शेअर 548 ते 577 रुपयेचा प्राइस बँड जाहीर केला आहे. हा IPO 2 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 पासून अँकर गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात.

हा IPO पूर्णपणे OFS असेल :
या कंपनीचा IPO पूर्णपणे OFS अंतर्गत बाजारात खुला केला जाईल. Uniparts India कंपनीच्या IPO मध्ये 14,481,942 इक्विटी शेअर्स कंपनीचे प्रवर्तक गट, गुंतवणूक संस्था आणि विद्यमान गुंतवणूकदारांद्वारे विक्रीसाठी बाजारात आणले जातील. एक गंमत अशी आहे की, ही कंपनी तिसऱ्यांदा आपल्या IPO आणण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी डिसेंबर 2018 आणि सप्टेंबर 2014 मध्ये सेबीने या कंपनीला आयपीओ साठी मंजुरी दिली होती, मात्र त्यावेळी हा आयपीओ येऊ शकला नव्हता.

कंपनीचे प्रमोटर करण सोनी, CG-NG नेवाडा ट्रस्ट, द मेहर सोनी,पामेला सोनी, आणि गुंतवणूक संस्था अशोका इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स लिमिटेड, अंबादेवी मॉरिशस होल्डिंग लिमिटेड हे प्रवर्तक समूह संस्था या IPO मध्ये आपले शेअर्स OFS अंतर्गत आपले शेअर्स खुल्या बाजारात विक्री करणार आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
Uniparts India Limited कंपनीची स्थापना 26 सप्टेंबर 1994 रोजी झाली होती. सिस्टम्स आणि सोल्युशन्स सर्व्हिस प्रदान करणारी कंपनी युनिपार्ट्स ही एक इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करणारी जागतिक कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः कृषी आणि बांधकाम, वनीकरण आणि खाणकाम, ऑफ हायवे मार्केटसाठी सिस्टम सेवा आणि प्रमुख पुरवठादारांपैकी एक म्हणून नावाजली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये या कंपनीचे 25 पेक्षा देशांमध्ये 125 पेक्षा जास्त ग्राहक ग्राहक वर्ग आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Unipart India IPO is ready to launch soon and opening date is announced 26 November 2022.

हॅशटॅग्स

Unipart India IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x