21 November 2024 9:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ?

Sambhaji Chhatrapati

Chhatrapati Sambhajiraje | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते, असं विधान केलं होतं. या विधानाला आक्षेप घेत संभाजीराजे छत्रपती, छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केला. तसेच भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणीही केली.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद अजूनही महाराष्ट्रात उमटत आहेत. संभाजीराजे छत्रपतींसह उदयनराजे भोसलेंनी भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केलीये. मात्र, सरकारकडून याबद्दल मौन बाळगल्यानं संभाजीराजेंचा पारा चढला.

उद्धव ठाकरे यांनी तर महाराष्ट्र बंद किंवा विराट मोर्चा काढण्याचे संकेत दिले आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीच दखल घ्यावी अशी मागणी केली होती.

आता तर माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त करत सरकारलाच इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीराजेंनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे भोसले म्हणतात, ‘भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!’, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी मोदी सरकारला दिलाय.

एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर जराही त्रागा किंवा संताप व्यक्त न करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वायफळ राजकीय टिपण्या करण्यासाठी परराज्यातून देखील प्रचंड वेळ काढत असल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. खोके तर ही छोटीमोठी गोष्ट आहे. फ्रिजच काय कंटनेर भरून भरून खोके कुणाकडे गेले? हे खोके कुणी पचवले? त्याचा शोध मी घेत आहे. हे सर्व मी एक दिवस बाहेर काढणार आहे, असा गर्भित इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता दिला. गुवाहाटीत ते पत्रकारांशी संवाद साधत होते. मात्र, कंटनेर भरून भरून खोके हे जरा अतीच विनोदी होतंय अशी टीका नेटिझन्स करत आहेत. तसेच अनेकांनी तर कंटनेर भरून भरून खोके तर रिझर्व्ह बँक सुद्धा पाठवत नाही अशी टिपिणी करताना शिंदेंची जोरदार खिल्ली उडवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sambhaji Chhatrapati Slams Shinde Government over no action against Governor check details on 27 November 2022.

हॅशटॅग्स

#Sambhaji Chhatrapati(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x