22 November 2024 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

Mutual Funds | पैसा कोणाला नको? म्युच्युअल फंडातून 14 कोटी रुपये परतावा हवा असल्यास गुंतवणूकीचा हा फॉर्मुला नोट करा

Mutual Fund

Mutual Funds| महागाईमुळे लोकांचे जीवन खूप आव्हानात्मक बनले आहे. लोकांवर कामाचा खूप ताण असून तुटपुंज्या पगारावर लोक दिवसभर राबत आहेत. त्यामुळे अनेक पगारदार व्यक्ती लवकर निवृत्ती घेऊन अशा मानसिक त्रासातून स्वतःची मुक्तता करून घेत आहेत. ज्या लोकांना लवकर निवृत्ती घेऊन स्वतंत्र व्हायचे आहेत, अशा लोकांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून पैसे गुंतवणूक करायला सुरुवात करावी. टॅक्स आणि गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही लवकरात लवकर तरुण वयात पैसे गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही तुमचे आर्थिक उद्दिष्ट बिना जोखीम साध्य करु शकता. गुंतवणूक तज्ञ तरुणांना म्युच्युअल फंड SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याचा आग्रह करतात. म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घ कालावधीमधे वार्षिक 12-15 टक्के परतावा सहज कमावता येतो.

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते.जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी पैसे गुंतवायला सुरुवात केली तर तुम्ही तुमच्या वयाच्या 60 वर्ष म्हणजेच पुढील 35 वर्षे सहज गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षी निवृत्ती घ्यायची असेल तर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी 25 वर्षे कालावधी शिल्लक आहे. या काळात तुम्ही नियमित गुंतवणूक करून भरघोस पैसे कमवू शकता.

लवकर गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होतो :
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही तरुण वयात गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही आपले आर्थिक ध्येय ठराविक काळात सहज साध्य करू शकता. म्युचुअल फंड SIP मध्ये 15X15 X15 या नियमाद्वारे गुंतवणूक केल्यास तुम्ही चांगला फायदा कमवू शकता. एका उदाहरणाने समजून घेऊ. जर तुम्ही 15 वर्षांच्या कालावधीसाठी म्युचअल फंड SIP मध्ये मासिक 15,000 रुपये जमा करायला सुरुवात केली तर, तुम्हाला वार्षिक सरासरी 12-15 टक्के परतावा सहज मिळू शकतो. योजनेच्या मॅच्युरिटीवर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी पेक्षा जास्त होईल. तथापि गुंतवणुक तज्ञ सल्ला देतात की, जसजशी तुमच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होत जाईल तसतशी तुम्ही मासिक एसआयपीच्या रकमेतही वाढ करावी. हा पर्याय तुम्हाला वार्षिक SIP स्टेप अप द्वारे उपलब्ध होईल. तुम्ही किमान रक्कम एसआयपी योजनेत मासिक आधारावर गुंतवणुक केल्यास सहजपणे आपले ध्येय साध्य करू शकता.

म्युचुअल फंड तज्ञ गुंतवणुकदारांना साधारणपणे 10 टक्के वार्षिक SIP स्टेप अपची शिफारस करतात. पण जर तुम्ही तुमच्या वयाच्या 50 व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 15 टक्के वार्षिक SIP स्टेप अप आधारे गुंतवणूक करावी.

गुंतवणूकीचा हिशोब समजून घ्या :
जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 15,000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली तर म्युच्युअल फंडाच्या 15X15X15 फॉर्मुला नुसार 25 वर्षांच्या नियमित गुंतवणुकीवर तुम्हाला सरासरी वार्षिक 15 टक्के परतावा मिळू शकतो. SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही SIP मध्ये 15 टक्के वार्षिक स्टेप अप वाढवला तर 25 वर्षांच्या कालावधीत तुम्ही 50 वर्षांची गुंतवणूक करू शकाल. या गणनेनुसार तुमच्याकडे दीर्घकाळात 14 कोटी रुपयेचा फंड तयार होऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund Scheme for investment for huge returns on 28 November 2022.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x