19 April 2025 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Penny Stock | अबब! या 1 रुपयाच्या पेनी शेअरने पैसा 54 पटीने वाढवला, तुम्हाला पैसे वाढवायचे आहेत? हा स्टॉक खरेदी करणार?

Penny Stock

Penny Stock | Sanmit Infra Ltd कंपनीने मागील 4 वर्षात आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. यावेळी या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 54 पट अधिक वाढवले आहेत. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 1.31 रुपयांवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन आता स्टॉक 73 रुपयांवर गेला आहे. सनमित इन्फ्रा लिमिटेड कंकंपनीचे मार्केट कॅप 1,015 कोटी रुपये आहे.

मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी सनमीत इन्फ्रा लिमिटेड कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 2.24 टक्क्यांच्या वाढीसह 73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 4 वर्षांपूर्वी म्हणजेच 21 डिसेंबर 2018 रोजी हा स्टॉक बीएसई इंडेक्स पहिल्यांदा ओपन झाला होता, त्यावेळी स्टॉकची किंमत फक्त 1.31 रुपये होती. सनमीत इन्फ्रा लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत सुरवातीपासून आतापर्यंत 5,472.52 टक्क्यांनी वधारली आहे. सनमीत इन्फ्रा लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली आहे की, ज्यां लोकांनी चार वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 55 लाख रुपये झाले आहे.

कंपनीची कामगिरी :
कंपनीची अलीकडील कामगिरी पाहता सनमीत इन्फ्रा लिमिटेडच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी दिसून येत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 17.21 टक्के वाढली आहे. त्याच वेळी, मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने स्टॉक खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना 216.57 टक्केचा बंपर परतावा कमावून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत स्टॉकच्या किंमतीत 144.07 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

सनमीत इन्फ्रा लिमिटेड कंपनीबद्दल थोडक्यात :
सनमीत इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा व्यवसाय तीन भागांमध्ये विभागला आहे. कंपनीची सुरुवात 1965 साली मुंबई येथून झाली होती. कंपनीने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये रिअल इस्टेट प्रकल्प पूर्ण केले आहेत. ही कंपनी जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट, पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करण्यासोबत रिअल इस्टेट प्रकल्पांचे बांधकामही करते.

कंपनीची आर्थिक स्थिती :
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सनमिट इन्फ्रा लिमिटेड कंपनीने एक कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता, जो मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 50 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 2 कोटी रुपये वार्षिक नफा कमावला होता. त्यावेळी ही कंपनीच्या महसुलात 2.66 टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती. 2022-23 च्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीने 33.78 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 35.1 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Sanmit Infra Ltd share price return on investment on 28 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या