25 November 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य
x

Post Office Scheme | पैसे डबल होणार! पोस्ट ऑफिसच्या 9 योजनांची लिस्ट सेव्ह करा, किती कालावधीत तुमचे पैसे दुप्पट करतील?

Post office scheme

Post Office Scheme | इंडिया पोस्ट ऑफिसतर्फे सामान्य लोकांना गुंतवणूक आणि बचत करता यावी म्हणून अनेक सुरक्षित बचत योजना राबवल्या जातात. या योजनांची सर्वात एक खास गोष्ट अशी की, या सर्व योजनांवर भारत सरकार सुरक्षेची हमी देते. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे बुडणार नाही याची हमी भारत सरकार देते. आज या लेखात आपण इंडिया पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत आणि गुंतवणूक योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या योजनांमध्ये गुंतवलेले पैसे किती दिवसांनी तुमचे पैसे दुप्पट होतील याचा देखील आपण आढावा घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ पोस्ट ऑफिस बचत योजना आणि त्यांचा परतावा

1) किसान विकास पत्र/KVP :
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.9 टक्के व्याज परतावा मिळू शकतो. या व्याज दरानुसार गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी 124 महिन्यांचा म्हणजेच 10 वर्षे 4 महिने इतका कालावधी लागेल.

2) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट :
सध्या पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट/NSC ya योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.8 टक्के दराने व्याज परतावा मिळू शकतो. या योजनेची मुदत 5 वर्ष आहे. ही योजना तुम्हाला आयकर सुत देखील मिळवून देते. 6.8 टक्के या व्याजदरानुसार तुम्ही योजनेत गुंतवणूक केली तर तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 10.59 वर्ष इतका कालावधी लागेल.

3) सुकन्या समृद्धी योजना :
सध्या इंडिया पोस्ट ऑफिसतर्फे राबवण्यात येणारी सुकन्या समृद्धी योजना तुम्हाला सर्वाधिक म्हणजे 7.6 टक्के व्याज परतावा देऊ शकते. ही योजना खास मुलींसाठी राबवली जाते, आणि यात गुंतवलेले पैसे दुप्पट होण्यासाठी 9.47 वर्षे इतका कालावधी लागेल.

4) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी/PPF :
सध्या इंडिया पोस्ट ऑफिसच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा मुदतपूर्ती कालावधी 15 वर्ष असून त्यावर तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळू शकतो. म्हणजेच या व्याज दरानुसार तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 10.14 वर्षे इतका कालावधी लागेल.

5) ज्येष्ठ नागरिक बचत योजना/SCSS :
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला सध्या 7.4 टक्के व्याजदराने परतावा मिळेल. या योजनेत गुंतवणूक केलेले पैसे दुप्पट होण्यासाठी 9 वर्ष 73 दिवस इतका कालावधी लागेल.

6) मंथली इन्कम स्कीम/MIS :
पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम/MIS मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.6 टक्के व्याज दराने परतावा मिळेल. या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी तुम्हाला 10 वर्ष 91 दिवस वाट पाहावी लागेल.

7) रिकरिंग डिपॉझिट/RD :
पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यास 5.8 टक्के दराने व्याज मिळतो. या व्याजदरानुसार जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमची रक्कम दुप्पट होण्यासाठी 12.41 वर्ष लागतील.

8) पोस्ट ऑफिस बचत योजना :
जर तुम्ही पोस्ट ऑफिस बचत योजना खात्यात पैसे जमा केले तर ते दुप्पट होण्यासाठी तुम्हाला खूप वाट पाहावी लागेल. कारण या बचत योजनेत फक्त 4.0 टक्के व्याज मिळतो. किमान 10000 रुपये दुप्पट होण्यासाठी तुम्हाला 18 वर्ष वाट पाहावी लागेल.

9) पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम :
सध्या पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेत 1 वर्षापासून 3 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 5.5 टक्के व्याज परतावा दिला जातो. या योजनेत गुंतवणूक केलेले पैसे दुप्पट होण्यासाठी 13 वर्षांचां का लागेल. त्याचप्रमाणे या योजने अंतर्गत 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर तुम्हाला 6.7 टक्के परतावा मिळेल. या व्याजदरानुसार तुम्ही पैसे गुंतवणूक केले तर ती रक्कम 10.75 वर्षांत दुप्पट होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of post office scheme for investment and making Money double on 29 November 2022

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x