Penny Stock | अपना सपना मणी मणी! या पेनी शेअरने 50 हजारावर 5 लाख परतावा दिला, अजून 35 टक्के वाढणार, नोट करा

Penny Stock | आज शेअर बाजारात पुन्हा हिरवळ पसरली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांक पुन्हा एकदा नवीन विक्रमी पातळीवर गेला आहे. सेन्सेक्समध्ये आज 272.79 अंकांची म्हणजेच 0.44 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली होती, आणि सेन्सेक्स 62777.59 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी-50 निर्देशांक 81.80 अंक म्हणजेच 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 18644.60 अंका ट्रेड करत होता. आज 1681 कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तर 1448 कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. आणि 136 कंपनीचे शेअर्स तटस्थ होते, त्यात कोणताही बदल झालेला नाही.
पुढील काळात शेअर बाजारात तेजीचा कल कायम राहू शकतो. दरम्यान एक शेअर कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. हा स्टॉक गुंतवणूकदारांना पुढील काळात मजबूत कमाई करून देईल अशी अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, त्याचे नाव आहे,”ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज”. ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 3 वर्षांत अप्रतिम परतावा कमावून दिला आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 25 ऑक्टोबर 2019 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 925 टक्के परतावा कमावून दिला आहे. NSE निर्देशांकावर 25 ऑक्टोबर 2019 रोजी हा स्टॉक 36.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक 375 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 9.25 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 50000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 5 लाखांपेक्षा जास्त वाढले आहेत.
शेअरची लक्ष किंमत :
ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत 375 रुपये आहे. शेअरखानने या ब्रोकर फर्मने या स्टॉकसाठी 505 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या किमतीपासून हा स्टॉक जर 505 रुपयांपर्यंत वाढला तर तुम्हाला 35 टक्के परतावा सहज मिळू शकतो. 35 टक्के रिटर्नसह तुमचे 3 लाख रुपये वाढून 4 लाख रुपये होतील.
शेअरची वाटचाल :
ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणूकदाराना 9 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. गेल्या एका महिनाभरात स्टॉक सपाट किमतीवर ट्रेड करत आहे. या स्टॉकने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत हा स्टॉक 9.5 टक्के पडला आहे. गेल्या एक वर्षात या कंपनीच्या शेअर्स नी फक्त 2 टक्के परतावा दिला आहे.
उच्चांक किंमत पातळी :
ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 625.70 रुपये आहे. तर शेअरची नीचांक किंमत पातळी 330.40 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप सध्या 4,700.31 कोटी रुपये आहे.
कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
ग्रीनपॅनेल ही कंपनी भारतातील लाकूड पॅनेलची निर्मिती करणारी सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे उत्तराखंड आणि आंध्र प्रदेश राज्यात अत्याधुनिक उत्पादन संयंत्र असून तिथे उच्च दर्जाचे मध्यम घनता असलेले फायबरबोर्ड, प्लायवूड, सजावटीच्या लिबास, फ्लोअरिंग आणि दरवाजे तयार केले जातात. नाविन्यपूर्ण डिझाईन आणि टिकाऊपणा हे या कंपनीच्या वस्तूंचे खास गुण आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stock of Greenpanel Industries share price return on investment on 30 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID