SIP Calculator | होय SIP गुंतवणूक चमत्कारी परतावा देते, फक्त हे गणित समजून घ्या, अनेक पटीने पैसा वाढेल
SIP Calculator | आजकाल तरुण शिक्षण आणि कॉलेज पूर्ण झाल्यावर लगेच नोकरी शोधतात आणि कामाला लागतात. चांगली कमाई सुरु होताच तरुणांच्या मनात बचत आणि गुंतवणुकीबाबत अनेक प्रश्न आणि शंका निर्माण होतात. किती गुंतवणूक करायची? आणि गुंतवणूक कधी सुरू करायची? असे प्रश्न तरुणांना भेडसावत असतात. गुंतवणूकीचा विचार करताना गुंतवणूकीची सुरुवात कधी करावी हा मुद्दा देखील विचारात घेणे आवश्यक आहे. किती गुंतवणूक करता त्यापेक्षा किती लवकर गुंतवणूक करता याचा विचार केला पाहिजे. जर तुम्ही लवकर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळणार. तरुण वयात नोकरी लागल्यावर सुरुवातीला जबाबदाऱ्यांचे ओझे कमी असते. अशा परिस्थितीत तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यावर भर दिला पाहिजे. ही गुंतवणूक भविष्यात तुम्हाला करोडो रुपये परतावा कमावून देऊ शकते.
2500 रुपयांच्या SIP वर 40 लाख परतावा :
म्युचुअल फंड SIP मध्ये दीर्घकालीन गुंतवणुक केल्यास बक्कळ पैसा कमावता येतो. चांगला परतावा मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे म्युचुअल फंड एसआयपी. एसआयपीदमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जातो. दीर्घकालीन गुंतवणुकीत केल्यास जोखीम फॅक्टर देखील कमी होतो. समजा तुमचे सध्याचे वय 25 वर्षे असून तुम्ही एसआयपीद्वारे दरमहा 2500 रुपये गुंतवणूक सुरू केली. आणि म्युच्युअल फंडाने तुम्हाला सरासरी वार्षिक 12 टक्के या दराने परतावा दिला तर SIP कॅल्क्युलेटरनुसार पुढील 25 वर्षांमध्ये तुम्हाला 47.5 लाख रुपये निव्वळ परतावा मिळू शकतो. या दरम्यान तुम्ही केलेली प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम फक्त 7.5 लाख रुपये एवढी असेल. आणि तुम्हाला 25 वर्षात 40 लाख रुपयांचा बंपर परतावा मिळणार.
गुंतवणुकीवर वेळेचा परिणाम :
गुंतवणुक करताना तुम्ही किती लवकर गुंतवणूक करता, हे खूप महत्त्वाचे आहे. समजा तुम्ही म्युचुअल फंड SIP मध्ये दरमहा 2500 रुपये रक्कम 30 वर्षे गुंतवणूक केली, आणि तुम्हाला 12 टक्के या किमान दराने परतावा मिळाला तर 30 वर्षानंतर तुम्हाला मिळणारा एकूण निव्वळ परतावा 88.24 लाख रुपये असेल. जर तुम्ही केवळ 5 वर्ष लवकर गुंतवणूक सुरू केली तर तुमचा परतावा दुप्पट होऊ शकतो. या 30 वर्षांत तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 9 लाख रुपये जमा होईल. आणि तुम्हाला या ठेवीवर 79.20 लाख रुपये परतावा मिळेल.
किती गुंतवणूक करावी?
किती गुंतवणूक करावी? हा यक्ष प्रश्न तरुणांच्या मनात कायम उभा असतो. फायनान्शियल मॅनेजमेंट तज्ञ नेहमी आर्थिक नियोजन करताना 50/30/20 नियम फॉलो करण्याचा सल्ला देतात. तज्ञांच्या मते, तुम्ही तुमचे सर्व आवश्यक खर्च तुमच्या उत्पन्नाच्या 50 टक्क्यांच्या आत ठेवले पाहिजे. या इतर गरजांसाठी 30 टक्के रक्कम बाजूला ठेवली पाहिजे. आणि किमान 20 टक्के पैसे बचत करून गुंतवले पाहिजे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| SIP Calculator For counting Returns on Mutual Fund SIP Investment on 2 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार