22 April 2025 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL
x

Post Office Scheme | ही पोस्ट ऑफिस योजना देते लाखो रुपयेचा गॅरंटीड परतावा, पैसे चक्रवाढ पद्धतीने वाढवते

Post Office Scheme

Post Office Scheme | तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि हमखास परतावा देणारे पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही योजना नक्की पहा. ही योजना गुंतवणुक करण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. अनेक वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा आपल्याकडे पैसे असतात मात्र तुम्हाला ज्या योजनेत गुंतवणुक करायची असते त्यात ठराविक कमाल मर्यादा ठरवून दिलेली असते. परंतु पोस्ट ऑफिसच्या NSC या अल्पबचत योजनेत गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. तुम्ही योजनेत हवी तेवढी रक्कम गुंतवू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सूट देखील दिली जाते. आणखी बरेच फायदे आहेत, चला जाणून घेऊ.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट/ NSC :
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्ष असतो. या योजनेतील गुंतवणुकीवर इंडिया पोस्ट ऑफीस तर्फे वार्षिक 6.8 टक्के दराने व्याज परतावा दिला जातो. या योजनेत गुंतवणूक केल्यास दुहेरी फायदा मिळतो. ही योजना तुम्हाला वार्षिक चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा कमावून देते, सोबत तुम्हाला आयकर कायद्यातील कलम 80C नुसार कर सवलतही दिली जाते. एकदा या योजनेत पैसे जमा केल्या आंशिक रक्कम काढता येणार नाही, म्हणजे तुमची पूर्ण रक्कम परताव्यासह मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावरच दिली जाईल. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार जर तुम्ही किमान 1000 रुपये या स्कीममध्ये जमा केले तर 5 वर्षानंतर तुम्हाला 1389.49 रुपये रक्कम परतावा म्हणून दिली जाईल.

लाखोंचा परतावा :
पोस्ट ऑफिस एनएससी स्कीम कॅल्क्युलेटरनुसार या योजनेमध्ये जर एखाद्याने 10 लाख रुपये एकरकमी जमा केले तर 5 वर्षानंतर मॅच्युरिटीवर त्याला 13,89,493 रुपये परतावा मिळेल. यामध्ये गुंतवणूकदाराला 10 लाख रुपये जमा केल्यास 389493 रुपये व्याज म्हणून मिळतील. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही नाजिकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता. NSC खाते उघडण्यासाठी तुम्हाला किमान 1000 रुपये जमा करावे लागतील. या योजनेतील गुंतवणुकीवर कोणतीही कमाल गुंतवणूक मर्यादा निश्चित केलेली नाही. तुम्ही या योजनेत 100 रुपयांच्या पटीत हवी तेवढी रक्कम जमा करू शकता. या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याची हमी भारत सरकारद्वारे दिली जाते.

अल्पवयीन मुलाच्या नावानेही खाते :
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजने अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठीं भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधे जाऊन खाते उघडता येते. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यात संयुक्त खाते देखील उघडू शकता. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे पालक त्यांच्या वतीने प्रमाणपत्र खरेदी करू शकतात. NSC मध्ये एकदा गुंतवणूक केल्यास 5 वर्षापूर्वी पैसे काढता येणार नाही. भारत सरकार प्रत्येक 3 महिन्यांनी NSC योजनेतील व्याजदराचे पुनरावलोकन करते.

NSC योजनेबद्दल महत्वाच्या गोष्टी :
* एनएससी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधे जाऊन अर्ज करू शकता.
* या योजनेतील गुंतवणुकीवर चक्रवाढ पद्धतीने परतावा दिला जातो, मात्र पैसे फक्त परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्यावरच काढता येतात.
* सर्व बँका आणि NBFC द्वारे कर्ज घेताना तुम्ही NSC सुरक्षा म्हणून गहाण ठेवू शकता.
* गुंतवणूकदार कुटुंबातील एका सदस्याचे नाव नॉमिनी म्हणून नामनिर्देशित करू शकतो.
* NSC इश्यूची तारीख आणि मॅच्युरिटीच्या तारखेदरम्यान एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| National Saving Certificate Post Office Scheme details for investment and earning huge returns on 1 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(231)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या