Post Office MIS | बँक FD पेक्षा पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा व्याज मिळेल, गुंतवलेले पैसेही सेफ
Post Office MIS | पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना ही योजना आपल्या गुंतवणुकदारांना मासिक आधारावर बचत करण्याची सुविधा प्रदान करते. निवृत्तीनंतर रमेशला खूप मोठी रक्कम मिळाली, ज्यातील 4.5 लाख रुपये त्याने पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवली. आणि त्याचा मित्र सुरेशने निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम बँकेच्या बचत खात्यात जमा केली. रमेशला पोस्ट ऑफीसच्या मासिक उत्पन्न योजनेत जमा केलेल्या 4.50 लाख रुपयांच्या बदल्यात दरमहा 2500 रुपये निश्चित उत्पन्न मिळू लागले. तर सुरेशने त्याची रक्कम बँक खात्यात जमा केली होती, यामुळे त्याला रमेशच्या तुलनेत खूप कमी व्याज परतावा मिळाला. कारण बँक बचत खात्यावर मिळणारे व्याज पोस्ट ऑफिस योजनेच्या तुलनेने खूप कमी असते. त्यामुळे जर तुमच्याकडे मोठी रक्कम असेल तर ती बँकेत जमा न करता पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत जमा केल्यास दरमहा चांगला परतावा मिळवू शकता, जो बँकेच्या इतर योजनेच्या तुलनेत खूप जास्त असेल. पोस्ट ऑफीसमधे संयुक्त खात्याद्वारे गुंतवणूक केल्यास तुमचा नफा देखील दुप्पट होऊ शकतो. (Post office Monthly Income Scheme)
दरमहा उत्पन्न मिळवा :
पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना आपल्या गुंतवणूकदारांना दरमहा एक ठराविक उत्पन्न मिळवून देते. पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेत तुम्ही एकरकमी गुंतवणूक करून दरमहा चांगली कमाई करू शकता. या योजनेत तुमचे जमा केलेले पैसे सुरक्षित राहतील याची हमी तुम्हाला भारत सरकार तर्फे दिली जाते. आणि तुम्ही 5 वर्षांची मुदत पूर्ण झाल्यावर संपूर्ण रक्कम काढू शकता. पोस्ट ऑफीस एमआयएस योजने अंतर्गत तुम्ही एकल आणि संयुक्तरित्या खाते उघडू शकता. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात पैसे कमावण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येतो. या पोस्ट ऑफिस अल्पबचत योजनावर भारत सरकार सुरक्षा हमी देत असल्याने ती पूर्णपणे जोखीममुक्त आहे.
व्याजदर वाढले :
भारत सरकार दर तिमाही मध्ये अल्पबचत योजनेच्या व्याजदराचे पुनर्विलोकन करत असते. त्यानुसार केंद्र सरकारने डिसेंबर तिमाहीसाठी काही लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतील ठेवींवर मिळणारे व्याजदर भारत सरकारने 6.6 टक्क्यांवरून वाढवून 6.7 टक्के केले आहे. त्यामुळे या योजनेत पैसे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना अधिक फायदा मिळणार आहे.
दरमहा कमवा 5025 रुपये : POMIS योजने अंतर्गत तुम्ही एकल खात्यात कमाल 4.50 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवू शकता. या योजनेतील ठेवींवर आता वार्षिक 6.7 टक्के परतावा दिला जातो. जर तुम्ही या योजनेतील संयुक्त खात्यात 9 लाख रुपये जमा केले तर वार्षिक 6.7 टक्के व्याजदरानुसार एका वर्षात तुम्हाला 60300 रुपये व्याज परतावा मिळेल. ही रक्कम 12 महिन्यांत विभाजित केली तर प्रत्येक महिन्यात तुम्हाला 5025 रुपये व्याज परतावा मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही एकल खात्यात कमाल 4,50,000 लाख रुपये गुंतवले तर सध्याच्या व्याजदराने तुम्हाला दरमहा 2513 रुपये व्याज परतावा मिळेल. 3 प्रौढ व्यक्ती देखील संयुक्त खाते उघडून गुंतवणूक करू शकता, मात्र त्याची गुंतवणुकीची कमाल मर्यादा 9 लाख रुपयेच असेल.
पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेचे फायदे : पोस्ट ऑफीस MIS या योजनेची एकवेळ मुदत 5 वर्ष निश्चित करण्यात आली आहे, परंतु 5 वर्षानंतर तुम्ही नवीन व्याजदरानुसार योजनेचा कालावधी आणखी वाढवू शकता. MIS योजने अंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला बँक एफडीच्या तुलनेत खूप जास्त व्याज परतावा मिळतो. जर तुम्ही मासिक आधारावर व्याजाची रक्कम काढली नाही तर ती रक्कम तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यातच राहतील आणि मूळ रकमेसह जोडून तुम्हाला त्यावर आणखी व्याज परतावा मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Post Office MIS Scheme Benefits and Investment Opportunities with New Interest rates on investment on 2 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार