18 April 2025 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

महाराष्ट्र हादरला | मुंबईत 42 वर्षीय महिलेवर गँगरेप तर पालघरमध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

Crime News

Crime News | कुर्ल्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार तर केलाच शिवाय सिगारेटने तिचे गुप्तांगही जाळले. आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवून महिलेला धमकी दिली की, जर तिने तोंड उघडले तर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू. महिला कुर्ला परिसरात राहते. बुधवारी तीन जणांनी जबरदस्तीने त्याच्या घरात प्रवेश केला, असे महिलेने पोलिसांना सांगितले. त्यावेळी ही महिला घरात एकटीच होती. या महिलेवर तिन्ही आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. त्यांनी महिलेला अनेक तास ओलीस ठेवले आणि बलात्कार केला.

अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी
आरोपीने महिलेच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. एवढेच नाही तर त्यांनी महिलेचे गुप्तांग सिगारेटने जाळून टाकले. तिच्यासोबत बलात्काराचा अश्लील व्हिडिओ बनवण्यात आल्याचंही पीडित महिलेनं सांगितलं. आरोपीने तिला धमकी दिली की तिने कोणालातरी सांगितले, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होईल.

पीडितेला धक्का बसला होता, तिने आपल्या शेजाऱ्याच्या माध्यमातून एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. त्याच्या मदतीने पीडित महिलेने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तिघांविरोधात भादंविच्या कलम ३७६, ३७६ (३), ३७७, ४५२, ३२३, ५०४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पालघरमध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
दुसरीकडे, पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच वर्षीय चिमुकलीवर 21 वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चिमुकलीवर अत्याचार करून उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Crime News Gang rape in Kurla check details on 05 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime News(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या