22 November 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे
x

बेळगावमध्ये 24 तासात हे हल्ले थांबले नाही तर त्या संयमाला!!.. शरद पवारांनी ठणकावलं

Maharashtra Belgaum

Maharashtra Belgaum | बेळगावमध्ये 24 तासात हे हल्ले थांबले नाहीतर त्या संयमाला एक वेगळा रस्ता पाहण्याची परिस्थिती निर्माण होईल आणि ही जबाबदारी कर्नाटकची मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकारवर असणार आहे, असा इशाराच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. तसंच, गृहमंत्री अमित शहा यांनाही खासदारांना सांगावे, जर कायदा कुणी हातात घेतला तर याची जबाबदारी केंद्रावर राहिल, असंही शरद पवारांनी ठणकावलं.

महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला
कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं आता महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला गंभीर इशारा दिला. अजूनही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका संयमाची आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनच चिथावणीखोर भूमिका घेतली जातेय. सहकाऱ्यांकडून हल्ले घडत आहेत. देशाच्या ऐक्याला हा फार मोठा धक्का आहे. हेच काम कर्नाटकातून होत असेल तर केंद्र सराकारला बघ्याची बूमिका घेऊन चालणार नाही, असे शरद पवार म्ङणाले.

ते म्हणाले, देशाला ज्यांनी संविधान दिलं. थोर महात्म्याच्या स्मरणाच्या दिवशी जे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडलं ते निषेधार्ह आहे. हे प्रकरण काही आठवड्यापासून एका वेगळ्याच स्वरुपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी 23 नोव्हेंबरला जत संबंधी भूमिका मांडली. 24 नोव्हेंबरला अक्कलकोटबद्दल बोलले. फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी टीका त्यांनी केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही स्टेटमेंट सातत्याने केले आहेत. सीमा भागातील स्थिती गंभीर झाली आहे. माझा स्वतःचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता होती. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याशी संपर्क साधला म्हणाले, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. हे वेळीच थांबलं नाही परिस्थिती चिघळू शकते.

उद्यापासून संसदेत अधिवेशन
उद्यापासून संसदेत अधिवेशन सुरू होत आहे, आम्ही महाराष्ट्रातील खासदारांना विनंती करतोय की, गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर विषय घालावा, जर तरीही परिस्थिती सुधारत नसेल आणि कुणी कायदा हातात घेत असेल तर याची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारला घ्यावी लागणार आहे, असा इशाराही शरद पवारांनी दिला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Belgaum vehicles were vandalized check details on 06 December 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra Belgaum(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x