23 November 2024 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Stocks To Buy | या 4 शेअर्समध्ये 4 आठवड्यांसाठी गुंतवणूक करून कमवा 23 टक्के परतावा, स्टॉक लिस्ट सेव्ह करा

Stocks to Buy

Stocks To Buy | काही दिवस विक्रमी तेजी आणि उच्चांक पातळी अनुभवल्यानंतर शेअर बाजारात पुन्हा चढ-उतार दिसून येत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला बाजारात जी काही पडझड पाहायला मिळाली होती त्याची सगळी वसुली मागील काही आठवड्यात पूर्ण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने या वर्षी चांगला परतावा मिळवून दिला आहे. पण शेअर बाजारात अस्थिरता आणि अनिश्चितता अजूनही कायम आहे. वाढती महागाई, भू-राजकीय तणाव याशिवाय आर्थिक मंदीचे संकेत हे संकट जागतिक अर्थव्यवस्थेवर कायम तांगलेल्या तलवारीसारखे लटकले आहेत. गुंतवणूकदारांना दर्जेदार कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावण्याचा सल्ला स्टॉक मार्केट तज्ज्ञ देत आहेत. काही कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय ब्रेकआउट पाहायला मिळाले आहे. या कंपनीच्या अरॉक पुढील 1 महिन्यात चांगली तेजी दिसून येईल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने अशा 4 स्टॉकची लिस्ट दिली आहे, ज्यात तुम्ही बिनधास्त पैसे लावू शकता.

एपीएल अपोलो ट्यूब्स लि :
* सध्याची ट्रेडिंग किंमत : 1187 रुपये
* खरेदी किंमत : 1187-1165 रुपये
* स्टॉप लॉस : 1113 रुपये
* अंदाजित वाढ : 11 टक्के – 15 टक्के

APL Apollo Tubes कंपनीच्या साप्ताहिक शेअर चार्टमध्ये 1150 रुपये ते 1177 रुपये पर्यंत मल्टिपल रेझिस्टन्स झोनचे ब्रेकआउट दिसून येत आहे. या ब्रेकआउटमध्ये शेअरच्या व्हॉल्यूम मध्ये वाढ दिसत आहे, जो स्टॉकचा वाढलेला सहभाग दर्शवतो. शेअर च्या साप्ताहिक चार्टवर स्टॉक High-High-Low असा पॅटर्न बनवत आहे. आपण स्टॉकचे दैनिक आणि साप्ताहिक चार्ट पॅटर्न निर्देशक RSI तेजीमध्ये पाहू शकता. पुढील काही दिवसांत अपोलो टयुब कंपनीचा शेअर 1303-1350 रुपये किंमत पातळी सहज स्पर्श करेल.

L&T फायनान्स होल्डिंग्ज :
* सध्याचा बाजार भाव : 91 रुपये
* खरेदी किंमत : 91-88 रुपये
* स्टॉप लॉस : 85 रुपये
* अंदाजित वाढ : 12 टक्के – 23 टक्के

L&T फायनान्स होल्डिंग्स कंपनीच्या शेअर्सचे साप्ताहिक चार्ट पॅटर्न सममितीय त्रिकोणी पॅटर्न ब्रेकआउट दर्शवत आहे. हा पॅटर्न नोव्हेंबर 2021 मध्येही पाहायला मिळाला होता. या ब्रेकआउटमध्ये स्टॉक व्हॉल्यूममध्ये वाढ दिसून येत आहे, जो स्टॉकचा वाढलेला सहभाग दाखवत आहे. साप्ताहिक चार्ट पॅटर्न निर्देशक RSI तेजीमध्ये पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांत L&T कंपनीचा शेअर 100 ते 110 रुपयांची किंमत पातळी स्पर्श करू शकतो.

कोफोर्ज लि. :
* सध्याचा बाजार भाव : 4250 रुपये
* खरेदी किंमत : 4250-4166 रुपये
* स्टॉप लॉस : 4000 रुपये
* अंदाजित वाढ : 10 टक्के-14 टक्के

Coforge कंपनीच्या शेअर्सचे साप्ताहिक चार्ट पॅटर्न 3200 रुपये किंमत पातळीच्या जवळ डबल बॉटम पॅटर्न ब्रेकआउट दर्शवत आहे. नेकलाइन 4060 रुपये किमतीवर आहे. या ब्रेकआउटमध्ये स्टॉकचा वाढीव व्हॉल्यूम दिसून आला आहे, जो स्टॉकचा वाढलेला सहभाग दर्शवत आहे. हा स्टॉक सध्या आपल्या 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या सरासरी किमतीवर ट्रेड करत आहे. साप्ताहिक चार्ट पॅटर्न निर्देशक RSI मध्ये तेजी पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांत Coforge कंपनीचा स्टॉक 4625-4800 रुपये किंमत स्पर्श करेल.

Dalmia Bharat :
* सध्याचा बाजार भाव : 1936 रुपये
* खरेदी किंमत : 1910-1872 रुपये
* स्टॉप लॉस : 1780 रुपये
* अंदाजित वाढ : 12 टक्के- 18 टक्के

दालमिया भारत कंपनीचा स्टॉक आपल्या साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर 1800-1760 रुपये किंमतीवर अनेक प्रतिरोधक क्षेत्र तोडत आहे. या कंपनीच्या स्टॉकने मध्यावधीच्या खालील दिशेने जाणाऱ्या ट्रेंडलाइनला देखील ब्रेकआउट केले असून हा ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न दर्शवत आहे. दैनिक आणि साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर RSI तेजीमध्ये आहे. या कंपनीचा स्टॉक पुढील काळात 2113-2230 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks to Buy Recommended by Stock market expert for New Target price on 06 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x