Money Making Stock | होय! हे शेअर्स अल्पावधीत देतील 67% परतावा, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, लिस्ट पहा
Money Making Stock | ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात 5 पैसे वाढवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 67 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओसवाल यांनी कोल इंडिया, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, ज्युबिलंट फूडवर्क्स, इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड आणि टाटा केमिकल्स या पाच कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या स्टॉक बद्दल पूर्ण माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, SGX Nifty live, Sensex LIVE)
नोव्हेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या स्टॉक मार्केट अहवालानुसार, जागतिक गुंतवणूक बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळाली आहे. भारतीय शेअर बाजाराची कामगिरी या काळात उत्तम राहिली आहे. भारतीय शेअर बाजाराने अमेरिका आणि इतर मोठ्या आर्थिक महासत्ता असलेल्या देशांच्या शेअर बाजारांच्या तुलनेत अप्रतिम कामगिरी केली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये एफआयआय ने आपली गुंतवणूक वाढवली आहे. त्यामुळे मोतीलाल ओसवाल यांना शेअर बाजारात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
1) इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि :
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने इंडोस्टार कंपनीच्या शेअरवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी कार्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉक साठी त्यांनी प्रति शेअर 257 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. जर तुम्ही इंडोस्टार कंपनीचे शेअर्स 153.75 रुपये या सध्याच्या किमतीवर खरेदी केले तर लक्ष किंमत गाठल्यावर हा स्टॉक तुम्हाला 67 टक्के संभाव्य नफा कमावून देईल. या स्मॉल कॅप एनबीएफसी क्षेत्रातील कंपनीचे मार्केट कॅप 1914 कोटी रुपये आहे. गेल्या 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 38 टक्के नफा कमावून दिला आहे. आणि मागील 5 वर्षात लोकांना 73 टक्क्यांचा जबरदस्त परतावा मिळाला आहे. या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 295 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी किंमत 116 रुपये आहे. ही कंपनी 2009 मध्ये स्टॉक मार्केटवर सूचीबद्ध करण्यात आली होती.
2) मॅक्रोटेक डेव्हलपर्स :
मोतीलाल ओसवाल फर्मने या रिअल इस्टेट क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या कंपनीचे शेअर सध्या 1073 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल सध्या 51,358 कोटी रुपये आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्के परतावा कमावून दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांना मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स प्रति शेअर 1530 रुपये या लक्ष्य किंमतीसाठी विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक तुम्हाला पुढील काळात 44 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून देऊ शकतो.
3) कोल इंडिया :
कोल इंडिया ही एक महारत्न दर्जा प्राप्त असलेली कंपनी आहे. कोल इंडिया कंपनीचे शेअर्स सध्या 231 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मोतीलाल ओसवाल फर्मने कोल इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 328 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही आज या कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास शेअरने लक्ष किंमत स्पर्श केली तर तुम्हाला 42 टक्के परतावा मिळेल. कोल इंडिया ही लार्ज कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 1,41,188.11 कोटी रुपये आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 263 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 139 रुपये होती. ही कंपनी मुख्यतः कोळसा खाण उद्योग क्षेत्रात काम करते.
4) ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर सध्या 550.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मोतीलाल ओसवाल फर्मने आपल्या गुंतवणुकदारांना ज्युबिलंट फूडवर्क्स लि. कंपनीचे सरेस खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. या कंपनीच्या शेअर साठी लक्ष किंमत प्रति शेअर 740 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही जर आज जुबिलंट कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर पुढील काळात तुम्हाला 34 टक्के संभाव्य नफा मिळेल. ही कंपनी मुख्यतः पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात उद्योग व्यवसाय करते. या कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 216 टक्के परतावा कमावून दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल सध्या 36,400 कोटी रुपये आहे.
5) टाटा केमिकल्स :
या कंपनीचे शेअर सध्या 1042 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. टाटा केमिकल कंपनीचे बाजार भांडवल 26,915 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1214 रुपये आहे. आणि 52 आठवड्यांचा नीचांक किंमत पातळी 773 रुपये होती. मागील 3 वर्षांत टाटा समूहाच्या टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 59 टक्के परतावा कमावून दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर बाय टॅग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 1,250 रुपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही जर आज टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास पुढील काळात 18 टक्के संभाव्य नफा मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| List of Money Making Stock has declared by Motilal Oswal brokerage firm on 08 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार