26 November 2024 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Salary Account | 90% पगारदारांना सॅलरी अकाउंटवर मिळणाऱ्या 'या' फ्री सुविधांविषयी माहिती नाही, अनेक फायदे मिळतात Yes Bank Share Price | येस बँक शेअर तुफान तेजीत, स्टॉक प्राईस 20 रुपयांच्या पार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK IREDA Share Price | IREDA शेअर मालामाल करणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदीला गर्दी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

Sarkari Shares | कमाईची संधी! या 5 सरकारी बँकेच्या शेअर्सवर ओव्हरवेट रेटिंग, टार्गेट प्राईस तपासा आणि खरेदीचा विचार करा

Sarkari Shares

Sarkari Shares | PSU बँकेच्या स्टॉकमध्ये मागील बऱ्याच काळापासून स्थिर वाढ पाहायला मिळत आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक या PSU बँकेचे शेअर्स आतापर्यंत 20 टक्के वधारले आहेत. शेअर बाजार अस्थिर असतानाही PSU बँकांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. पुढील येणाऱ्या काळातही PSU बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करतील असा विश्वास जागतिक गुंतवणूक कंपनी मॉर्गन स्टॅन्ले नी व्यक्त केला आहे.

मॉर्गन स्टॅनली फर्मने असा विश्वास व्यक्त केला आहे की, भारतीय सरकारी बँकांची कामगिरी बरीच प्रमाणात सुधारली आहे. तसेच उच्च मार्जिन, सातत्यपूर्ण कर्ज वाढ आणि पुढील काही वर्षांत ऑपरेटिंग नफ्यात सुधारणा होण्याचे संकेत या घटकामुळे PSU बँकिंग स्टॉकमध्ये मजबूत वाढ होत आहे. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये एका वर्षभरात 60 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. निफ्टी-50 निर्देशांक फक्त 6 टक्क्यांनी वर गेला आहे. मॉर्गन स्टॅन्ले फर्मने काही PSU बँकांचे शेअर्स निवडले आहेत, जे पुढील काळात जबरदस्त रिटर्न्स देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकची लक्ष्य किंमत.

बँक ऑफ बडोदा :
मॉर्गन स्टॅन्लेने BoB च्या शेअरवर ओव्हरवेट रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या बँकिंग स्टॉकसाठी लक्ष्य किंमत 195 रुपये वरून 220 रुपये अपडेट करण्यात आली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 1.74 टक्के वाढीसह 174.10 रुपयांवर ट्रेड करत होता.

बैंक ऑफ इंडिया :
मॉर्गन स्टॅन्लेने बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग दिली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉक ची पुढील लक्ष्य किंमत 95 रुपये वरून 125 रुपयेवर अपडेट करण्यात आली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 4.29 टक्के वाढीसह 90 रुपयांवर ट्रेड करत होता.

पीएनबी बँक :
मॉर्गन स्टॅनलीने पंजाब नॅशनल बँकेच्या स्टॉकवर समान वेटेज रेटिंग दिली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मॉर्गन स्टॅन्लीने या PSU बँकेच्या शेअरची लक्ष्य किंमत 40 रुपये वरून 60 रुपयेवर अपडेट केली आहे. पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स किरकोळ 0.55 टक्के वाढीसह 55.45 रुपयांवर ट्रेड करत होते.

स्टेट बँक ऑफ इंडिया :
SBI च्या शेअरवर मॉर्गन स्टॅन्लीने 715 रुपयांची लक्ष्य किंमत दिली असून स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग दिली आहे.

कॅनरा बँक:
मॉर्गन स्टॅन्लीने या बँकेच्या स्टॉकला लो वेटेज स्टॉक असे मानांकन दिले आहे. मात्र या बँकच्या शेअरची लक्ष्य किंमत 280 रुपये वरून 345 रुपयेवर अपडेट केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sarkari Shares of PSU bank recommended by Morgan Stanley for buying and earning huge returns on 07 December 2022.

हॅशटॅग्स

Sarkari Share(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x