22 November 2024 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

गुजरात विधानसभा निवडणूक निकालात मोदींची हवा, तर हिमाचल प्रदेशात ठरले फुसका बार, काँग्रेस दणदणीत विजयाकडे

Gujarat Assembly Election 2022

Gujarat Assembly Election Result | गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचे ताजे कल आणि निकालामुळे भारतीय जनता पक्ष सलग सातव्यांदा राज्यात सत्ता काबीज करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांतच भाजपने राज्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे. 2017 च्या निवडणुकीत 99 जागांपर्यंत कमी झालेल्या भाजपला यावेळी दोन तृतीयांश जागांसह 151 जागा जिंकता येणार आहेत, हा राज्याच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे.

अशा परिस्थितीत गेल्या पाच वर्षांत भाजपने कोणती पावले उचलली, ज्यामुळे राज्याचा राजकीय चेहरामोहरा बदलला आणि भाजप आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. भाजपविरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर असूनही बंपर बहुमत मिळवण्यात मोठी भूमिका बजावणारी पाच प्रमुख कारणे समोर आली आहेत. त्यात व्हायब्रंट गुजरात आणि मोदींचा करिष्मा, मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ बदललं, दिग्गजांची तिकीटं कापली, पाटीदारांना पाठिंबा दिला आणि बंडखोरांना नियंत्रित केलं ही प्रमुख कारणं समोर आली आहेत.

हिमाचल प्रदेशात काँग्रेसची सत्ता
१९९०च्या दशकापासून हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची प्रथा आहे. या बदलात कांगडा प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावतो. कांगडामध्ये ज्याने १० जागा जिंकल्या त्यानेच राज्यात सरकार स्थापन केले, असे बोलले जाते. 2017 च्या निवडणुकीत कांगडा जिल्ह्यातील विधानसभेच्या 15 जागांपैकी 11 जागा भाजपने जिंकल्या होत्या. भाजपचे जय राम ठाकूर राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

2012 मध्ये कांग्रामध्ये काँग्रेसने 10 जागा जिंकल्या होत्या आणि वीरभद्र सिंह राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, तर 2007 मध्ये भाजपने नऊ आणि काँग्रेसने सहा जागा जिंकल्या होत्या. 2003 मध्येही कांग्रामध्ये काँग्रेसनं सरकार स्थापन केलं तेव्हा 11 जागा जिंकल्या होत्या. 1998 मध्ये कांगडामध्ये 10 जागा जिंकून भाजपने सरकार स्थापन केलं होतं. यावेळी कांगडामध्ये काँग्रेस 15 पैकी 10 जागांवर विजय मिळवताना दिसत आहे, तर भाजपला केवळ पाच जागा राखता येतील असं दिसतंय. भाजपला आठ जागा गमवाव्या लागत असल्याचे दिसत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gujarat Assembly Election 2022 Result check details on 08 December 2022.

हॅशटॅग्स

#Gujarat Assembly Election 2022(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x