Tata Group Share | टाटा ग्रुपचा हा शेअर मिळतोय स्वस्तात, स्टॉक मध्ये लोकांना श्रीमंत बनवण्याची क्षमता, खरेदी करणार?

Tata Group Share | टाटा उद्योग समूहातील शेअर्स शक्यतो आपल्या गुंतवणुकदारांना कधीही निराश करत नाही. जर तुम्ही सध्या टाटा ग्रुपमधील कोणत्याही शेअर्समध्ये पैसे लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात टाटा पॉवर कंपनीचा स्टॉक झपाट्याने वाढू शकतो, आणि येणाऱ्या काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून देऊ शकतो. मागील काही काळापासून टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला होता. परंतु आता टाटा पॉवर कंपनीचा स्टॉक या विक्रीचा दबावातून रिकव्हर होताना दिसत आहे. टाटा पॉवर कंपनीचा शेअर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात 227.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Power Share Price | Tata Power Stock Price | BSE 500400 | NSE TATAPOWER)
मल्टीबॅगर परतावा देणारा स्टॉक :
टाटा पॉवर या ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 218 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी टाटा पॉवर कंपनीचा स्टॉक मागील तीन वर्षांत 328 टक्के पेक्षा अधिक वाढला आहे. तथापि टाटा पॉवरच्या शेअर्सवर मागील एक वर्षापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. त्यानंतर स्टॉकमध्ये मंद तेजी पाहायला मिळाली आणि स्टॉक आता पुन्हा पडला आहे.
टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 2022 यावर्षात 3.67 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 2022 या वर्षात टाटा पॉवर कंपनीचा स्टॉक 3.67 टक्के वाढला आहे. त्याच वेळी स्पर्धक कंपन्या जसे की, अदानी पॉवरचे शेअर्स एका वर्षात 228 टक्क्यांनी वधारले आहेत. टाटा पॉवर कंपनीचा स्टॉक सध्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, आणि 100 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीवर ट्रेड करत आहे. परंतु हा स्टॉक 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या खाली ट्रेड करत आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअरचा PE गुणोत्तर प्रमाण 28.17 आहे.
टाटा पॉवर स्टॉकवर तज्ञांचे मत :
टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स दीर्घ कालावधीत चमत्कारिक परतावा कमावून देऊ शकतात यात शंकाच नाही. सध्या हा पॉवर स्टॉक निश्चितपणे विक्रीच्या दबावाला सामोरे जात आहे. मात्र दीर्घ मुदतीत या स्टॉकमधे 350-400 रुपये किमती पर्यंत जाण्याची क्षमता आहे. 300 रुपयांची किंमत पातळी स्पर्श केल्यास हा स्टॉक तेजीत येऊ शकतो. Tips2trade फर्मच्या तज्ज्ञांनी विश्वास व्यक्त केला आहे की, टाटा पॉवर स्टॉक येत्या काही दिवसात तुम्हाला 210 रुपयेवर खरेदी करण्याची संधी देईल. हा स्टॉक निम्न किमतीवर खरेदी करून तुम्ही 335 रुपये लक्ष किमतीसाठी होल्ड करु शकता.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 85 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीने एकूण 935.18 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 505.66 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Tata Power Share price has fallen down because of selling pressure in since last few trading session on 08 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK