22 November 2024 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

अत्यंत संतापजनक आणि लज्जास्पद, महिला सुरक्षेसोबत दगा, महिला सुरक्षा निर्भया फंडाच्या पैशांमधून शिंदे गटाच्या मंत्र्यांची सुरक्षा

Nirbhaya Fund

Nirbhaya Fund | राज्यातील निर्भया पथकासाठी खरेदी करण्यात आलेली वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर येताच विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार आदित्य ठाकरेंनंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या मुद्यावरून शिंदे सरकारला लक्ष केलं आहे. हा अत्यंत नीच प्रकार असल्याचे ते म्हणाले. ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी निर्भया फंडची स्थापना करण्यात आली. पण महाराष्ट्रात या फंडचा वापर शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्यांचा हा आरोप खरा असेल तर ही महाराष्ट्रासाठी खरंच अतिशय लाजिरवाणी बाब आहे, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे.

ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट. मला याबाबत समजलं तेव्हा धक्का बसला. मनमोहन सिंह सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी या फंडला सुरवात केली होती. सत्ता आणि प्रशासनाचा चुकीचा वापर केला जातोय”, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. गृहमंत्र्यांनी निर्भया फंड प्रकरणाची चौकशी करावी. निर्भया फंडाचा वापर शिंदे गटाच्या सुरक्षेसाठी होणं चूक आहे”, असं रोखठोक मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं.

शिवसेना महिला नेत्यांचा हल्लाबोल :
दरम्यान, याच विषयावरून शिवसेनेच्या महिला नेत्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासहित महिला आमदार तसेच माजी महापौरांनी जोरदार पाने हल्लाबोल करताना शिंदे सरकारवर सडकून टीका केली. तसेच हाच विषय संसदेत मांडणार असल्याचं खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Serious allegation on Shinde government about Nirbhaya fund check details on 11 December 2022.

हॅशटॅग्स

#Nirbhaya Fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x