12 December 2024 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

PPF Scheme SIP | पोस्ट ऑफिस PPF योजनेत करा जलद कमाई, SIP प्रमाणे गुंतवणूक करा,अल्पावधीत पैसे वाढवा

PPF scheme SIP

PPF Scheme SIP | म्युच्युअल फंड एसआयपी स्कीम गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय मानला जातो. या योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास तुम्ही अल्पावधीत पैसे वाढवू शकता. गुंतवणूक छोटी असो वा मोठी याने काही फरक पडत नाही. एसआयपी योजनेत गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो. परंतु म्युचुअल फंड एसआयपी बाजारातील जोखमीच्या अधीन असते. म्हणूनच सुरक्षित गुंतवणुकीवर हमखास परतावा मिळावा म्हणून लोक PPF सारख्या सरकारी योजनांमध्ये पैसे लावतात. PPF योजनेतही SIP प्रमाणे दरमहा गुंतवणूक करता येते. तुम्हाला फक्त योग्य पद्धतीने आर्थिक नियोजन करायचे आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही पोस्ट ऑफिसची सर्वात लोकप्रिय योजना आहे, जी दीर्घ काळात उत्तम परतावा कमावून देते.

PPF योजना थोडक्यात :
PPF योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. PPF खात्यात तुम्ही एका वर्षात कमाल 1.5 लाख रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. PPF योजनेचे खास वैशिष्ट म्हणजे वर्षभरात तुझी एकरकमी गुंतवणुकीव्यतिरिक्त, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP प्रमाणे दरमहा गुंतवणूक करू शकता. PPF योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारा वार्षिक व्याज परतावा FD किंवा RD सारख्या योजनेपेक्षा खुप जास्त असतो. या स्किममध्ये तुम्ही अल्प गुंतवणूक करून भविष्यात मोठा परतावा कमवू शकता. PPF योजनेतील गुंतवणूकीतून जो परतावा तुम्हाला मिळेल तो करमुक्त असेल.

PPF कॅल्क्युलेटरच्या मदतीने गणना करु :
दर मासिक गुंतवणूक : 5000 रुपये
वार्षिक गुंतवणूक : 60,000 रुपये
वार्षिक परतावा व्याज दर : वार्षिक 7.1 टक्के
15 वर्षांनंतर परिपक्वतेवर मिळणारी रक्कम: 16.25 लाख
एकूण प्रत्यक्ष गुंतवणूक : 9 लाख रुपये
एकूण व्याज लाभ : 7.25 लाख रुपये

PPF कॅल्क्युलेटरच्या मदतीने गणना करु की 10,000 रुपये गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल :
मासिक गुंतवणूक रक्कम : 10,000 रुपये
वार्षिक गुंतवणूक रक्कम : 1,20,000 रुपये
परतावा व्याज दर : 7.1 टक्के चक्रवाढ
15 वर्षानंतर मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम : 32.55 लाख रुपये
एकूण प्रत्यक्ष गुंतवणूक : 18 लाख रुपये
व्याज परतावा लाभ : 14.55 लाख रुपये

PPF योजनेचे वैशिष्ट्य :
* सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये एका आर्थिक वर्षात कमाल 1.50 लाख रुपये गुंतवता येतात.
* या योजनेत एका वर्षात कमाल 12 हप्त्यांमध्ये गुंतवणूक करता येते.
* PPF योजनेत तुम्ही किमान 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता.
* PPF योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळतो. तथापि, त्रैमासिक आधारावर त्याचा सरकार तर्फे व्याज दराचे पुनर्विलोकन केले जाते.
* PPF योजनेत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या नावने गुंतवणूक करता येते.
* PPF योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे, परंतु मॅच्युरिटीनंतर तुम्ही कालावधी 5-5 वर्षे वाढवू शकता.
* PPF योजना ही एक सरकारी अल्पबचत योजना असल्याने भारत सरकारतर्फे या ठेवीवर सुरक्षा हमी पुरवली जाते.
* या योजनेतील गुंतवणुकीवर हमखास परतावा मिळतो, आणि योजनेत पैसे सुरक्षित असतात.
* पीपीएफ खात्यावर तुम्ही गरज पडल्यास कमी व्याजदराने कर्ज देखील घेऊ शकतात.
* खाते उघडल्यानंतर तिसऱ्या आणि सहाव्या वर्षांत कर्ज घेता येते.

कर सवलतीचा लाभ :
पोस्ट ऑफिस PPF मध्ये गुंतवणूक केल्यास 1.50 लाख रुपये पर्यंत रक्कम करमुक्त असते. IT कायद्याच्या कलम 80C अंतर्गत PPF योजनेतील गुंतवणुकीवर कर लाभ दिला जातो. या योजनेत 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त असते. पीपीएफमध्ये मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या दोन्हींवर रकमेवर कोणताही आयकर भरावा लागत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF scheme SIP Investment Plan benefits check details on 11 January 2023.

हॅशटॅग्स

PPF scheme SIP(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x