22 November 2024 10:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Quick Money Share | झटपट पैसा पाहिजे? 5 दिवसात या 5 शेअर्सनी 91% परतावा दिला, लिस्ट सेव्ह करा

Quick Money Share

Quick Money Share | 9 डिसेंबर 2022 रोजी जागतिक तेल बाजारात किमती घसरल्यामुळे मागील आठवड्यात शेअर बाजार लाल निशाणीवर ट्रेड करत करत होता. मागील आठवड्यात गुंतवणूकदारांनी कमावलेला सर्व नफा गमावला. गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी 1 टक्क्यांहून अधिक नफा गमावला आहे. RBI चे महागाई विरोधात आक्रमक भूमिका, जागतिक आर्थिक मंदी येण्याचे संकेत, आणि पुढील आठवड्यात होणारी FOMC ची बैठक हे सर्व घटक लक्षात ठेवून गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा अवलंबला आहे. हेच कारण आहे की, भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. ऊर्जा, इन्फ्रा, ऑटो आणि टेक कंपनीच्या शेअर्स मध्ये पडझड पाहायला मिळत आहे.

तथापि, बँकिंग आणि एफएमसीजी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढलेल्या खरेदीमुळे तोटा थोडा कमी झाला आहे. सेन्सेक्समध्ये मागील आठवड्यात 700 अंकांची घट पाहायला मिळाली होती, आणि आठडव्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 62,182 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी-50 निर्देशांक ही 200 अंकांनी पडला होता, आणि 18,500 अंकावर ट्रेड करत होता. त्याच वेळी, निफ्टी स्मॉलकॅप-100 निर्देशांकमध्ये 1 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. पण मागील आठवड्यात 5 कंपनीचे शेअर्स प्रवाहाच्या विरोधात हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. चला तर मग जाणून घेत या कंपनीच्या शेअर्सबद्दल.

RR Financial :
RR Financial या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 18.77 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात सलग 5 ट्रेडिंग सेशन या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 91.3 टक्क्यांचा अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. हा शेअर मागील 5 दिवसात 8.87 रुपये किमतीवरून 16.97 रुपयांवर गेला आहे. मागील शुक्रवारी शेअर 10 टक्क्यांच्या वाढीसह 16.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ज्या गुंतवणूकदारानी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते त्यांना अवघ्या 5 दिवसात 91.3 टक्के म्हणजेच जवळपास 1.91 लाखांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. पण स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे खूप जोखमीचे असते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.

SBEC शुगर लिमिटेड :
एसबीईसी शुगर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच शेअर 29.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र आता त्यात वाढ होऊन शेअर्स 52.85 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अशा प्रकारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या पाच दिवसात 80.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 251.85 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसात SBEC कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 80.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा परतावा FD सारख्या गुंतवणूक पर्यायांपेक्षा अनेक पट चांगला मानला जातो. मागील शुक्रवारी या कंपनीचे शेअर 10 टक्क्याच्या वाढीसह 52.85 रुपयांवर ट्रेड करत होता.

तिजारिया पॉलीपाइप्स :
तिजारिया पॉलीपाइप्स कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 70.45 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सनी लोकांची गुंतवणूक 70.45 टक्के वाढवली आहे. हा स्टॉक 4.40 रुपये किमतीवरून आता 7.50 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 21.33 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.73 टक्क्यांच्या वाढीसह 7.50 रुपयांवर ट्रेड करत होते.

ऑप्टिमस इन्फ्राकॉम :
Optimus Infracom कंपनीच्या शेअर्सनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 247.60 रुपये किमतीवरून सध्या 363.50 रुपयांवर ट्रेड करत आहेत. या शेअर मध्ये पैसे लावून एका आठवड्यात गुंतवणूकदारांनी 46.81 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 3,120.91 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 11.71 टक्क्यांच्या वाढीसह 363.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

पंजाब आणि सिंध बँक :
पंजाब अँड सिंध बँकेच्या शेअर्सने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळवून दिला आहे. हा स्टॉक पाच दिवसापूर्वी 23.25 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन आता शेअर 33.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. शेअरमधे पैसे लावून गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसात 45.49 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 22,942.81 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 7.12 टक्क्यांच्या वाढीसह 33.85 रुपयांवर ट्रेड कॉफी होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of sharas has increased Quick Money on investment in short term on 13 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x