19 April 2025 9:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Aditya Birla Mutual Fund | पैसाच पैसा! जबरदस्त म्युचुअल फंड योजना, अल्पावधीत पैसे दुप्पट होतं आहेत, स्कीम डिटेल वाचा

Aditya Birla Sun Life Frontline Equity Fund Growth

Aditya Birla Mutual Fund | दिवसभर काम केल्यावर तुम्ही रात्री शांत झोपी जाता, आणि पुन्हा सकाळी उठून कामावर जाता, हे चक्र असेच सुरू राहते. तुम्ही एवढी मेहनत पैसे कमावण्यासाठी करता. पण तुम्ही जेव्हा झोपलेले असताना, तेव्हा तुमचे काम चालू नसते, म्हणजेच तुमची कमाई त्या काळासाठी थांबलेली असते. जर तुम्हाला झोपेत असतानाही पैसे कमवायचे असतील तर म्युचुअल फंड योजनेत पैसे लावा. तुम्ही काम करो किंवा न करो, तुम्ही झोपेत असो किंवा नसो, तुमचे पैसे मात्र तुमच्या साठी काम करत राहतील, आणि तुमची मजबूत कमाई होत राहील. (Aditya Birla Sun Life Frontline Equity Fund Regular Plan Growth Plan NAV)

पैसा लावणे म्हणजे गुंतवणूक करणे हे तुम्हाला समजले असेलच. गुंतवणूकही अशा ठिकाणी करावी, जिथून तुम्हाला जबरदस्त परतावा मिळत राहील. अशा योजनेत पैसे लावा जिथे पैसा वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. मागील काही वर्षात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची क्रेझ खूप वाढली आहे. कारण म्युचुअल फंड योजना तुम्हाला अगदी कमी रकमेने गुंतवणूक करण्याचा पर्याय देते. यात पैसे लावून तुम्ही दीर्घकाळात बक्कळ पैसा कमवू शकता. असाच एक म्युच्युअल फंड आदित्य बिर्ला ग्रुपतर्फे चालवला जातो. या स्कीमने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.

आश्चर्यकारक परतावा :
आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी म्युचुअल फंडाने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. म्युचुअल फंड तज्ज्ञांच्या अहवालानुसार, हा म्युचुअल फंड 30 ऑगस्ट 2002 रोजी म्हणजेच 20 वर्षांपूर्वी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत या योजनेने दर वार्षिक सरासरी 19.25 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना दर तीन वर्षांनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करते.

सरासरी वार्षिक 19.25 टक्के या दराने परतावा देऊन या म्युचुअल फंडाने 20 वर्षांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. जर तुम्ही या म्युचुअल फंड योजनेत 10,000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती तर, 20 वर्षांत तुम्हाला 1.82 कोटी रुपये इतका मोठा परतावा मिळाला असता. मागील 10 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या ठेवीदारांना 13.35 टक्केचा वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत 10 हजारांची मासिक SIP गुंतवणूक केल्यास तुम्हाला 10 वर्षात 24.04 लाख रुपये परतावा मिळाला असता.

3 वर्षात दिला जबराट परतावा :
ज्या लोकांनी 5 वर्ष कालावधीसाठी या योजनेत 10000 रुपये एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांना 8 लाख 61 हजार रुपये परतावा मिळाला आहे. गेल्या 5 वर्षात या म्युचुअल फंड योजनेने सरासरी वार्षिक 14.45 टक्के दराने परतावा दिला आहे. मागील 3 वर्षांत या म्युचुअल फंडाने लोकांना सरासरी वार्षिक 19.5 टक्के दराने परतावा कमावून दिला आहे. या दरम्यान अवघ्या 3 वर्षात मासिक 10,000 रुपयांच्या SIP वर गुंतवणूकदारांनी 4.82 लाख रुपये परतावा मिळवला आहे. मागील 2 वर्षात, या म्युचुअल फंडाने 24.66 टक्के सरासरी वार्षिक रिटर्न्स दिले आहेत. मागील एका वर्षात या योजनेने वार्षिक सरासरी 6.09 टक्के परतावा कमावून दिला आहे, जो 4.95 टक्के या त्याच्या श्रेणीतील इतर म्युचुअल फंडाच्या परताव्याच्या तुलनेत खूप चांगला आहे.

तथापि, निफ्टी-100 TRAI बेंचमार्क निर्देशांकाशी तुलना केल्यास ABSL म्युचुअल फंड योजनेचा, परतावा अल्प आहे. निफ्टी-100 TRAI या निर्देशांकाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 7.74 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. मागील 3 वर्षात या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. त्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत या म्युचुअल फंड योजनेने लोकांचे गुंतवणूक मूल्य 33 पट अधिक वाढवले आहेत.

फंडाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी :
30 जून 2022 पर्यंत आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड अंतर्गत AUM 21534.38 कोटी रुपये नोंदवले गेले होते. 29 ऑगस्ट 2022 रोजी या म्युच्यअल फंडाचा NAV 338.76 रुपये होता. फंडाचे खर्चाचे प्रमाण त्याच्या श्रेणीमध्ये सर्वाधिक आहे म्हणजे 1.75 टक्के आहे. ABSL म्युचुअल फंड वित्त, तंत्रज्ञान, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऑटोमोटिव्ह उद्योग करणाऱ्या कंपनीमध्ये पैसे लावतो. ABSL म्युचुअल फंडाच्या टॉप 5 होल्डिंग्समध्ये ICICI बँक, HDFC बँक, इन्फोसिस लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि लार्सन अँड टुब्रो यासारख्या दिग्गज कंपन्या सामील आहेत. देशांतर्गत बाजारात गुंतवणूक करणाऱ्या या म्युचुअल फंडाच्या होल्डिंगमध्ये 86.6 टक्के लार्ज-कॅप कंपन्याची गुंतवणूक, 9.31 टक्के मिड-कॅप कंपन्या मधील गुंतवणूक, आणि 2.1 टक्के स्मॉल-कॅप कंपन्यांमधील गुंतवणुकीचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aditya Birla Sun Life Frontline Equity Fund Regular Plan Growth check details on 28 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Aditya Birla Mutual Fund(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या