21 November 2024 11:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची स्कीम तुम्हाला एक्स्ट्रा रेग्युलर कमाई करून देईल, दर महिन्याला पगारासमान रक्कम मिळेल

Post Office Scheme

Post Office Scheme | इंडिया पोस्ट ऑफिस तर्फे आपल्या ग्राहकांसाठी खूप फायद्याच्या अल्पबचत योजना राबवल्या जातात. पोस्ट ऑफिसमधे लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताय कारण त्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. यामुळे देशातील कोट्यवधी लोकांनी पोस्ट ऑफीसच्या विविध योजनेत आपल्या आयुष्यभराची कमाई जमा केली आहे. गुंतवणूकीची सुरक्षा आणि निश्चित हमी परताव्यामुळे, पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. यापैकीच एक जबरदस्त परतावा मिळवून देणारी योजना म्हणजे पोस्ट ऑफीस मासिक उत्पन्न योजना/POMIS आहे.

एकरकमी गुंतवणूक :
POMIS योजनेत एकरकमी गुंतवणूक करून तुम्ही दरमहा ठराविक व्याज परतावा कमवू शकता. तुम्ही या योजनेला स्मॉल पेन्शन स्कीम म्हणू शकता. एकरकमी पैसे या योजनेत जमा केल्यास तुम्हाला दरमहा नियमित स्वरूपात उत्पन्न सुरू होईल. पोस्ट ऑफिसच्या POMIS योजनेचा कालावधी पाच वर्ष निश्चित करण्यात आला आहे. जर तुम्ही कालावधी वाढवू इच्छित असाल तर तुम्ही बिनधास्त या स्किमचा कालावधी 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता.

किमान गुंतवणूक रक्कम :
POMIS योजनेचा परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्हाला गुंतवणूक केलेली पूर्ण रक्कम परत दिली जाते. सध्या पोस्ट ऑफीस मासिक उत्पन्न योजनेत 6.6 टक्के वार्षिक या दराने व्याज परतावा मिळतो. या योजनेत कमाल गुंतवणूक मर्यादा रक्कम 4.5 लाख रुपये आहे. तर या योजनेअंतर्गत तुम्ही किमान 1000 रुपये जणांकडून गुंतवणूक सुरू करु शकता.

गुंतवणुकीवर परतावा :
जर तुम्ही POMIS योजनेत एकरकमी 4.5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला वार्षिक 6.6 टक्के दराने 29,700 रुपये व्याज परतावा मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही रक्कम दे महिन्याला पेन्शन सारखी घेऊ शकता. या प्रकरणात तुम्हाला दरमहा 2475 रुपये व्याज परतावा मिळेल. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या पत्नी किंवा इतर नातेवाईक सोबत मिळून संयुक्त खाते देखील उघडू शकता. संयुक्त खात्यात कमाल 9 लाख रुपये जमा करता येतात.

दरमाह 5000 कमवा :
जर तुम्ही POMIS योजने अंतर्गत संयुक्त खात्यात 9 लाख रुपये एकरकमी गुंतवणुक केली तर तुम्हाला वार्षिक 59,400 रुपये परतावा मिळेल. ही रक्कम दरमहा घ्यायची असेल तर तुम्हाला दरमहा 4950 रुपये व्याज परतावा मिळेल.

स्कीम बेनिफिट :
इंडिया पोस्ट ऑफीस मासिक उत्पन्न योजने अंतर्गत तुम्ही जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन गुंतवणूक खाते उघडू शकता. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या नावावर बचत खाते असणे आवश्यक आहे. 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची कोणतीही भारतीय नागरिक व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office Scheme for investing money on monthly basis to earn regular income on 13 December 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x