23 November 2024 8:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Stock | 169% परतावा देणारा मल्टीबॅगर शेअर स्प्लिट होणार, आता स्वस्त दरात खरेदी करता येणार, डिटेल्स नोट करा

Multibagger Stock

Multibagger Stock | शेअर बाजारात एका मागून एक कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट चा झपाटा सुरू केला आहे. आता आणखी एका कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीचे नाव आहे, आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज कंपनी 1:5 या प्रमाणात स्टॉक विभाजित करेल. सोमवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, त्यात स्टॉक स्प्लिटचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. बीएसई निर्देशांकावर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.89 टक्क्यांच्या वाढीसह 121 रुपयांवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Akashdeep Metal Industries Share Price | Akashdeep Metal Industries Stock Price | BSE 538778)

Akashdeep Metal Industries Share Price
आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, 12 डिसेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, आणि त्या बैठकीत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 5 शेअर्समध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टॉक स्प्लिट नंतर कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपयांवर येईल. कंपनीने या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट अजून उघड केलेली नाही.

गुंतवणूकदारांना जलद परतावा :
आकाशदीप मेटल्स कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर परतावा देणारे शेअर्स आहेत. 2022 या वर्षात आतापर्यंत आकाशदीप मेटल्स कंपनीच्या शेअरची किमत 169 टक्क्यांनी वधारली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 43 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागीलएका महिन्यात त्या स्टॉकमध्ये 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आकाशदीप मेटल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 33.3 रुपये आहे. आणि स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 174.5 रुपये आहे.

कंपनीच्या ताळेबंद वर एक नजर :
आकाशदीप मेटल कंपनीवर थोडे कर्ज आहे. कंपनी कर्ज वेळेवर फेडण्याचा प्रयत्न करते आहे. सकारात्मक गोष्ट अशी की, मागील 4 तिमाहीत या कंपनीच्या महसुलात कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर मागील दोन तिमाहीत कंपनीने जबरदस्त कमाई केली आहे. कंपनीच्या नफ्यातही सकारात्मक वाढ होत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Akashdeep metal industries has announced Stock Split on 14 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x