22 April 2025 10:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL
x

PPF Investment | PPF गुंतवणूक करता? मॅच्युरिटीला 3 पर्याय उपलब्ध असतात माहिती आहेत? फायद्याचे पर्याय लक्षात ठेवा

PPF investment

PPF Investment | आज काल आपल्याकडे गुंतवणुक करण्यासाठी अनेक पर्याय आणि योजना उपलब्ध आहेत. पण आजही लोक पोस्ट ऑफिसच्या योजनांवर अधिक भरोसा ठेवतात. इंडिया पोस्ट ऑफिसतर्फे अनेक अल्प बचत योजना राबवल्या जातात. पोस्ट ऑफिस च्या सर्व योजनापैकी सर्वात प्रसिद्ध योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी/PPF. पीपीएफ योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. जेव्हा या योजनेचा 15 वर्ष परिपक्वता कालावधी पूर्ण होतो, तेव्हा गुंतवणूकदारांना 3 पर्याय उपलब्ध होतात. आज या लेखात आपण PPF मधील याच पर्यायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य :
आपल्या देशातील बहुसंख्य लोक पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात, कारण या योजनेत कोणताही धोका नसतो. PPF योजनेतील गुंतवणुकीवर भारत सरकारची सुरक्षा हमी दिलेली असते. PPF योजना तुम्हाला निश्चित परतावा कमावून देते. योजनेचा तिसरा फायदा म्हणजे छोटी रक्कम गुंतवणूक करून, तुम्ही दीर्घ कालावधीत खूप मोठा फंड निर्माण करू शकता. दीर्घ कालीन गुंतवणूक करण्यासाठी पीपीएफ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. PPF योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सवलतही मिळते. गुंतवणूकदारांना पीपीएफमधील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सवलत दिली जाते. PPF योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के दराने परतावा मिळतो. ही योजना तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळवून देते. PPF मध्ये 15 वर्षे सतत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने खूप मोठा परतावा मिळवू शकतो.

योजनेच्या परिपक्वतेवर उपलब्ध 3 पर्याय : 

पहिला पर्याय :
PPF योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. PPF मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना 15 वर्षांच्या कालावधीनंतर तीन पर्याय दिले जातात. पहिला पर्याय असतो, PPF मॅच्युरिटीवर व्याज परताव्यासह संपूर्ण पैसे काढून घेण्याचा. तुमचे सर्व पैसे मॅच्युरिटीवर करमुक्त असतात. जर तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर सर्व पैसे काढायचे असतील तर तुम्हाला इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन योजना बंद करत असल्याचा फॉर्म भरून सबमिट करावा लागेल. तिथे तुमचे ओळखपत्र पाहून तुम्हाला तुमचे सर्व पैसे दिले जातील.

दुसरा पर्याय :
PPF योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला दुसरा पर्याय दिला जातो. तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्याची मुदत आणखी 5 वर्ष कालावधीसाठी वाढवू शकता. PPF योजनेचा मोठा फायदा म्हणजे, तुम्हाला ही योजना 5-5 वर्ष मुदत वाढवण्याची मुभा देते. 5-5 वर्ष योजनेचा कालावधी 3 वेळा वाढवला तर तुमच्या निधीत कमालीची वाढ होईल. गुंतवणुकीचा कालावधी आणखी 5 वर्ष वाढवण्यासाठी एक अर्ज करावा लागतो. 5 वर्ष वाढीव कालावधीत तुम्हाला पैसे हवे आल्यास तुम्ही ते कधी शकता.

तिसरा पर्याय :
PPF योजनेच्या मुदतपूर्तीनंतर तुम्ही आणखी पैसे जमा न करताही पीपीएफ खाते चालू ठेवू शकता. तुम्हाला जमा रकमेवर नियमित व्याज परतावा मिळत राहील, आणि तुमचे पीपीएफ खाते निष्क्रिय होणार नाही. अशावेळी PPF खात्यातून पैसे काढल्यास किंवा पैसे जमा न केल्यास तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही.

मुलांच्या नावाने पैसे गुंतवणूक करा :
जर समजा तुम्ही तुमच्या 2 वर्षाच्या मुलाच्या नावाने PPF खाते उघडले, आणि तो 19 वर्षांचा होईपर्यंत 17 वर्ष कालावधीसाठी 1.5 लाख रुपये वार्षिक त्याच्या नावावर जमा केले, तर तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 25.5 लाख रुपये जमा होईल. या गुंतवणुक रकमेने तुमचे मूल 19 वर्षांचे झाल्यावर त्याला 54.3 लाख रुपये परतावा मिळेल. जर तुम्ही दर महिन्याला 25000 रुपये जमा केले तर, तुमचे मूल 19 वर्षांचे झाल्यावर त्याला 1.1 कोटी रुपये परतावा मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF investment options after completion of Maturity period on 14 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PPF Investment(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या