22 November 2024 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Paytm Share Price | तरीही फ्लॉप होणार? बायबॅक जाहीर करूनही स्टॉकमध्ये पडझड कायम, गुंतवणूकदारांनी काय करावं?

Paytm Share price

Paytm Share Price | One97 Communications ही Paytm ची पॅरेंट कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच 850 कोटी रुपयेच्या शेअर बायबॅक प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या बायबॅक अंतर्गत Paytm कंपनी 810 रुपये प्रति शेअर या बाजारभावाने 850 कोटी रुपये किमतीचे शेअर्स बाजारातून खरेदी करणार आहे. यामुळे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पैज लावणाऱ्या ट्रेडर्सला प्रति शेअर 270 रुपयेचा फायदा मिळाला आहे. एवढा मजबूत फायदा मिळत असूनही गुंतवणूकदारामध्ये पेटीएम कंपनीच्या शेअरबाबत शंका आहेत. Paytm कंपनीचे शेअर्स 0.82 टक्केच्या किंचित वाढीसह 543.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र स्टॉक दिवसा अखेर 1.30 टक्के घसरला आणि 532.50 रुपयांवर ट्रेड करत होता.

शेअर बायबॅकचा तपशील थोडक्यात :
Paytm ची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सच्या संचालक मंडळाने खुल्या बाजारातून शेअर बायबॅक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने खुल्या बाजारातून 850 कोटी रुपये किमतीचे शेअर बायबॅक करायला मान्यता दिली असून, कंपनी किमान आणि कमाल बायबॅक किमतीच्या आधारे 5,246,913 इक्विटी शेअर्सची खरेदी करणार आहे. या बायबॅक अंतर्गत Paytm कंपनी आपले शेअर्स 810 रुपयेला खरेदी करेल. One97 कम्युनिकेशन्स कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, Paytm कंपनीने स्टॉक बायबॅक करण्यासाठी खुल्या बाजाराचा पर्याय निवडला आहे. Paytm कंपनीने बायबॅक प्रक्रिया कमाल सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.

फ्लॉप आयपीओ आणि बुडीत डिजिटल पेमेंट कंपनी :
मागील वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये Paytm कंपनीने आपला आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला केला होता. नोव्हेंबर 2021 मध्येच पेटीएम कंपनीचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. Paytm कंपनीच्या शेअरची किंमत IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 75 टक्के घसरली आहे. One97 Communications या Paytm च्या मूळ कंपनीने 2021 मध्ये 18,300 कोटी रुपयेचा सर्वात मोठा IPO जाहीर केला होता. पेटीएमच्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 2,150 रुपये निश्चित करण्यात आली होती. आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपली IPO इश्यू किंमत कधीही स्पर्श केली नाही, म्हणून ज्या गुंतवणूकदारांनी paytm कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावले होते, त्यांचे पैसे मोठ्या प्रमाणत बुडाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Paytm Share price is Still falling after announcing Rights issue to existing Shareholders on 15 December 2022.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x