24 November 2024 10:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Vodafone Idea Share Price | फक्त 8 रुपयाच्या या शेअरने 1 दिवसात 13% परतावा, आजही तेजीत, पुढे नेमकं काय होणार?

Vodafone Idea share price

Vodafone Idea Share Price | सलग काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया/VI या भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स रिकव्हरीच्या मार्गावर परतताना दिसत आहेत. आज म्हणजे शुक्रवारी सकाळी हा शेअर 8.52 रुपयांवर ट्रेड करत असून त्यात 1.43% वाढ पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया /Vi कंपनीचे शेअर्स 13 टक्के वधारले होते. NSE निर्देशांकावर Vodafone Idea कंपनीचे शेअर्स 9.49 टक्क्यांच्या वाढीसह 8.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशन दरम्यान स्टॉक मध्ये 13.27 टक्क्यांची वाढ झाली होती, आणि शेअर 8.96 रुपयेवर पोहचला होता. VI कंपनीचे बाजार भांडवल 27,847 कोटीपेक्षा जास्त आहे. 20 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर 7.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील वर्षी 14 डिसेंबर 2022 रोजी VI कंपनीचे शेअर्स 16.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)

स्टॉकमध्ये तेजीचे कारण :
बिझनेस स्टँडर्डने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला होता, त्यानुसार भारत सरकार व्होडाफोन आयडिया कंपनीसाठी अधिक व्यापक पुनर्रचना योजना आखण्याचा विचार करत आहे. दरम्यान व्होडाफोन आयडिया/VI आणि तिची विक्रेता एटीसी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 1,600 कोटी रुपयांच्या लेटर ऑफ क्रेडिटच्या सबस्क्रिप्शनची अंतिम तारीख वाढवली आहे . आता लेटर ऑफ क्रेडिटच्या सबस्क्रिप्शनची नवीन तारीख बदलून 28 फेब्रुवारी 2022 नक्की करण्यात आली आहे. VI कंपनीने कर्जावरील थकीत व्याजाचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकारकडून परवानगी मागितली होती, मात्र सरकारकडून यावर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लेटर ऑफ क्रेडिटच्या सबस्क्रिप्शनची अंतिम तारीख वाढवण्यचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेअर मध्ये जबरदस्त घसरण :
वोडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सवर मागील एक वर्षापासून विक्रीचा जबरदस्त दबाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील एका वर्षात शेअरची किंमत 43 टक्क्यांनी घटली आहे. या काळात शेअर 15 रुपये किमतीवरून 8.65 रुपयांपर्यंत पडला आहे. त्याच वेळी 2022-23 या चालू आर्थिक वर्षात शेअरची किंमत 41 टक्क्यांनी पडली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea share price has dropped almost half check details on 16 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x