22 November 2024 6:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

TTML Share Price | टाटा ग्रुपचा हा शेअर 55% स्वस्त झालाय, पण टाटा के साथ नो घाटा समजून गुंतवणूकदरांचा स्टॉकवर विश्वास?

TTML Share price

TTML Share Price | टाटा उद्योग समूहातील एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना निराश केले आहे. 2022 या वर्षात हा स्टॉक 55 टक्क्यांनी पडला आहे. आपण ज्या शेअर बद्दल बोलतोय त्याचे नाव आहे, Tata Teleservices Maharashtra Ltd अर्थातच TTML. या कंपनीच्या शेअर मध्ये मागील काही काळात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या काही महिन्यापासून या शेअरवर प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. सध्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 98.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

शेअर किमतीचा इतिहास :
बीएसई इंडेक्सवर उपलब्ध माहितीनुसार टीटीएमएल कंपनीचे शेअर्स मागील काही आठवड्यापासून लाल निशाणी वर कमजोरी दर्शवत आहेत. 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 55 टक्के पडली आहे. या दरम्यान शेअर 216 रुपयांवर ट्रेड करत होता, मात्र त्यात पडझड सुरू झाल्यामुळे शुक्रवारी (16 December 2022) शेअर 97.80 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी TTML कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील सहा महिन्यांत 17.66 टक्क्यांनी घटली आहे. 2022 या चालू वर्षात हा स्टॉक 45.25 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. TTML ही एक लार्ज कॅप कंपनी असून, तिचे बाजार भांडवल 19,295.14 कोटी रुपये आहे.

गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान :
जर तुम्ही 2022 या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2022 मध्ये टाटा समूहाच्या TTML कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊन 45 हजार रुपयांवर आले असते. TTML कंपनीचा शेअर आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 65 टक्क्यांनी पडला आहे. 11 जानेवारी 2022 रोजी TTML कंपनीचा शेअर 291.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते.

तज्ज्ञ काय सांगतात
5G तंत्रज्ञान पूर्णपणे अंमलात आल्यावर टीटीएमएल पुन्हा उभारी घेईल असं तज्ज्ञ सांगत आहेत. तसेच या कंपनीसोबत टाटांचं नाव असल्याने गुंतवणूक आणण कठीण नसल्याचं देखील तज्ज्ञ सांगत आहेत. परिणामी गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित होतं आहेत.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी म्हणून काम करते. ही कंपनी आपल्या मार्केट सेगमेंटमध्ये मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. TTML कंपनी आपल्या ग्राहकांना व्हॉईस डेटा सेवा प्रदान करते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत दिग्गज कंपन्यांचा समावेश होतो. स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते मागील एका महिन्यात TTML कंपनीने आपल्या ग्राहक कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुविधा लाँच केली आहे. या कंपन्यांना क्लाउड आधारित सुरक्षा सेवा आणि वेगवान इंटरनेटसह , ऑप्टिमाइझ्ड नियंत्रण प्रदान केल्याने TTML कंपनीला आपल्या ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| TTML Share price has fallen down and disappointed their Shareholders after touching Low price on 17 December 2022.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x