22 November 2024 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

PPF Calculator | पोस्ट ऑफिसच्या योजनेत SIP प्रमाणे गुंतवणूक करून 14.55 लाख परतावा मिळवा, गणित समजून घ्या

PPF Calculator

PPF Calculator | म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणुकीचे एक जबरदस्त साधन असून, यात दीर्घकाळात पैसे अनेक पटींनी वाढतात. गुंतवणूक रक्कम छोटी असल्याने काही फरक पडत नाही, कारण SIP मध्ये चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो. परंतु म्युचुअल फंड एसआयपी शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. म्हणूनच सुरक्षित कमाईसाठी लोक सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मात्र PPF योजनेतही SIP प्रमाणे गुंतवणूक करून चक्रवाढ पद्धतीने परतावा कमावता येतो. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF योजनेत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास अप्रतिम परतावा मिळतो.

PPF योजना थोडक्यात :
PPF योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. एका आर्थिक वर्षात PPF खात्यात कमाल 1.5 लाख रुपये जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. पण PPF योजनेची खास गोष्ट म्हणजे वर्षभरात एकरकमी गुंतवणुकीव्यतिरिक्त तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनप्रमाणे दरमहा गुंतवणूक करू शकता. PPF योजनेमध्ये मिळणारा व्याज परतावा FD किंवा RD च्या तुलनेत खूप जास्त असतो. PPF योजनेत अल्प गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात मोठा फंड तयार करू शकता. या योजनेत मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम करमुक्त मानली जाते.

PPF कॅल्क्युलेटर नुसार मिळणारा परतवा :
* मासिक गुंतवणूक रक्कम : 5000 रुपये
* वार्षिक गुंतवणूक : 60,000 रुपये
* वार्षिक व्याज दर : 7.1 टक्के चक्रवाढ
* 15 वर्षांनंतर मिळणारा परतावा : 16.25 लाख रुपये
* एकूण गुंतवणूक रक्कम : 9 लाख रुपये
* व्याज परतावा रक्कम : 7.25 लाख रुपये

PPF कॅल्क्युलेटरनुसार 10,000 मासिक गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
* मासिक गुंतवणूक रक्कम : 10,000 रुपये
* वार्षिक गुंतवणूक : 1,20,000 रुपये
* वार्षिक व्याज दर : 7.1 टक्के चक्रवाढ
* 15 वर्षानंतर मिळणारी परतवा रक्कम : 32.55 लाख
* एकूण गुंतवणूक रक्कम : 18 लाख रुपये
* व्याज परतावा रक्कम : 14.55 लाख रुपये

PPF योजनेचे वैशिष्ट्य :
* PPF योजनेमध्ये एका आर्थिक वर्षात कमाल 1.50 लाख रुपये गुंतवणूक करता येते. या योजनेत 12 हप्त्यांमध्ये गुंतवणूक करता.
* PPF योजनेत किमान 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करता येते.
* PPF योजनेतील गुंतवणुकीवर सध्या वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळतो. त्रैमासिक आधारावर या व्याजदराचा आढावा घेतला जातो.
* 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या नावाने ही खाते उघडून पीपीएफ खात्यात गुंतवणूक करता येते. मात्र या खात्याची जबाबदारी पालकांकडे असते.
* PPF योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे, परंतु योजनेच्या मॅच्युरिटीनंतरही गुंतवणूकीचा कालावधी 5-5 आणखी वाढवत येतो.
* PPF योजना एक सरकारी बचत योजना असल्याने, त्यावर भारत सरकार पूर्ण सुरक्षा हमी प्रदान करते.
* पीपीएफ खात्यावर अल्प व्याजदराने कर्ज देखील घेता येतात. गुंतवणूक सुरू केल्यावर तिसऱ्या आणि सहाव्या वर्षांत कर्ज घेता येते.

पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेल्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यावर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणूकदाराला कर सवलत दिली जाते. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळते. पीपीएफमध्ये मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या दोन्हींवर कोणताही आयकर भरावा लागत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Calculator To count Return on investment in long term to make money double on 19 December 2022.

हॅशटॅग्स

#PPF Calculator(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x