22 November 2024 8:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Money Making Share | या शेअरने 1 महिन्यात 24% परतावा दिला, आता ही कंपनी टाटा ग्रुप खरेदी करणार, स्टॉक खरेदी करणार?

Money Making Shares

Money Making Share | टाटा उद्योग समूह लवकरच एक मोठी बिझनेस डील करण्याच्या तयारीत आहे. भारतातील आठव्या सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड हाऊसमधील कंट्रोलिंग स्टेक ताब्यात घेण्यासाठी टाटा उद्योग समूहाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. टाटा ग्रुप UTI अॅसेट मॅनेजमेंट कंपनी मधील कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्याची तयारी करत आहे. यासाठी टाटा समूह चार सरकारी कंपन्यांशीही चर्चा करत आहे. या नवीन घडामोडीमुळे काल बीएसई इंडेक्सवर UTI अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांची वाढीसह 907 रुपयांपर्यंत पोहचले होते. ट्रेडिंग सेहनच्या शेवटच्या काही तासात या कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढून 860.10 रुपयांवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 854 रुपये किमतीवर लाल निशाणीसह ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, UTI AMC Share Price | UTI AMC Stock Price | BSE 543238 | NSE UTIAMC)

सरकारी मालकीची कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया/ LIC , स्टेट बँक ऑफ इंडिया/ SBI , बँक ऑफ बडोदा यांच्याकडे संयुक्तपणे UTI AMC मध्ये 45.16 टक्के मालकी वाटा आहे. टाटा ग्रुपला कंट्रोलिंग स्टेकची डील पूर्ण करण्यासाठी इतर गुंतवणूकदारांनी ही मंजुरी दिली आहे. तसेच टाटा उद्योग समूहाला UTI अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी आणखी एका मोठ्या गुंतवणूक संस्थेकडून तत्वतः मान्यता प्राप्त झाली आहे. या गुंतवणूक संस्थेचे नाव आहे, TRowe Price Group. ही एक जागतिक गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी असून तिची UTI AMC मध्ये 23 टक्के मालकी भागीदारी आहे.

एका महिन्यात 24 टक्के वाढ : UTI AMC Share Price
टाटा ग्रुपची ही डील पूर्ण झाल्यास टाटा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि यूटीआय एएमसी यांचे विलीनीकरण पूर्ण होईल. विलीनिकरणानंतर निर्माण झालेली संस्था भारतातील चौथी सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असेल. मागील एका महिन्यात UTI अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 24 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्सची किंमत 39 टक्क्यांनीवर गेली आहे. मात्र 2022 या वर्षात आतापर्यंत यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये 22 टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती.

चालू आर्थिक वर्षात UTI AMC कंपनीने 534 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. UTI AMC कंपनीची स्टॉक मार्केट लिस्टिंग ऑक्टोबर 2020 मध्ये झाली होती. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 10733 कोटी रुपये आहे. UTI AMC मधील 45 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यासाठी टाटा उद्योग समूहाला 4400 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. याशिवाय 26 टक्के अनिवार्य ओपन ऑफरसाठी कंपनील टाटा ग्रुप 2500 कोटी रुपये खर्च करेल. आर्थिक वर्ष 2022 मध्ये UTI AMC कंपनीने 1319 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, आणि कंपनीने 534 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Group is going to buy Majority of stake in UTI AMC Share Price zoomed check details on 20 December 2022.

हॅशटॅग्स

Money Making Shares(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x