22 November 2024 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Stocks to Buy | बँक 1 महिन्यात 23% व्याज देईल? पण हे शेअर्स 1 महिन्यात 23 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा

stock to Buy

Stocks To Buy | शेअर बाजाराने तेजीच्या दरम्यान आपली विक्रमी उच्चांक पातळी स्पर्श तर केली, मात्र त्यात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळाला आणि, बाजार पुन्हा एका लाल निशाणीवर व्यवहार करत आहे. नुकताच सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला होता, त्यानंतर पुन्हा बाजारात अस्थिरता पाहायला मिळाली होती. या वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जी कमजोरी आली होती, त्यातून बाजार पूर्णपणे सावरला आणि गुंतवणूकदारांनी त्यातून मजबूत कमाई देखील केली होती. सध्या शेअर बाजारात अजूनही अनिश्चितता पाहायला मिळत आहे. वाढती महागाई, भू-राजकीय तणाव, युद्ध, याशिवाय संभाव्य आर्थिक मंदी यामुळे शेअर्स बाजार तणावात आहे. गुंतवणूक तज्ज्ञ नेहमी सावध राहून केवळ दर्जेदार कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. पडझडीच्या दरम्यान काही कंपन्यांच्या शेअर्समधे लक्षणीय ब्रेकआउट पाहायला मिळाला आहे. या शेअर्सनी मागील 1 महिन्यात आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीज काही शेअर्सची यादी जाहीर केली आहे, ही यादी सेव्ह करा.

महिंद्रा CIE ऑटोमोटिव्ह :
* सध्याची किंमत : 325 रुपये
* खरेदी किंमत : 320-314 रुपये
* स्टॉप लॉस: 288 रुपये
* अंदाजित वाढ : 18%-23%

महिंद्रा CIE ऑटोमोटिव्ह कंपनीने साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर 324-313 रुपये किंमत पातळीच्या नाजूक एक मल्टिपल रेझिस्टन्स झोन पार केला आहे. स्टॉकमध्ये हा ब्रेकआउट चांगल्या ट्रेडिंग व्हॉल्यूमसह पाहायला मिळाला आहे. हे शेअरमध्ये येणाऱ्या तेजीचे लक्षण आहे. स्टॉक सध्या आपल्या 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या सरासरी किमतीवर ट्रेड करत आहे, जो स्टॉकमध्ये तेजीचे संकेत देत आहे. दैनिक आणि साप्ताहिक ट्रेडिंग निर्देशक RSI मध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचा शेअर्स पुढील काळात 375-390 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

बलरामपूर चिनी मिल्स :
* सध्याची किंमत : 394 रुपये
* खरेदी किंमत : 390-384 रुपये
* स्टॉप लॉस : 362 रुपये
* अंदाजित वाढ : 13% –16%

बलरामपूर चिनी मिल्स कंपनीच्या शेअरमध्ये कमजोर चार्ट पॅटर्नसह अनेक प्रतिरोधक क्षेत्रे निर्माण झाले आहेत. दैनंदिन ट्रेडिंग चार्टवर हा स्टॉक उच्च-उच्च-निम्न या पॅटर्नवर ट्रेड करत आहे. हा पॅटर्न स्टॉकमध्ये सकारात्मक तेजी दाखवत आहे. या स्टॉकमध्ये हा ब्रेकआउट चांगल्या व्हॉल्यूमसह पाहायला मिळत आहे, जो स्टॉकमध्ये तेजी येण्याचे संकेत देत आहे. दैनिक आणि साप्ताहिक ट्रेडिंग निर्देशक RSI मध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचा शेअर पुढील काळात 437-450 रुपये किंमतीवर पोहोचू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

लिंडे इंडिया :
* सध्याची किंमत : 3419 रुपये
* खरेदी किंमत : 3400-3332 रुपये
* स्टॉप लॉस : 3220 रुपये
* अंदाजित वाढ : 9% – 12%

लिंडे इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 3370 रुपये किंमत पातळीपासून साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर सममितीय त्रिकोणी पॅटर्नचा ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. स्टॉकमध्ये हा ब्रेकआउट चांगल्या व्हॉल्यूमसह असून, हे स्टॉकमधे तेजीचे लक्षण दर्शवत आहे. हा स्टॉक सध्या आपल्या 20, 50, 100 आणि 200 दिवसाच्या सरासरी किमतीवर ट्रेड करत आहे, ज्यात तेजीचा कल पाहायला मिळत आहे. दैनिक आणि साप्ताहिक ट्रेडिंग निर्देशक RSI मध्ये तेजी दिसून येत आहे. या कंपनीचा स्टॉक पुढील काळात 3660-3785 रुपये पर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of shares shared by Axis Securities to Buy stock for short term to earn good profit on 20 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x