24 November 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

मुख्यमंत्री शिंदेंवर भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप, न्यायालय हस्तक्षेप झाल्याचं सांगतं तेव्हा ही बाब गंभीर - उद्धव ठाकरे

CM Eknath Shinde

CM Shinde Accused of Plot Scam | हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंडावरुन झालेल्या आरोपामुळे चांगलाच गदारोळ माजला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.

…तर मग निर्णयाला स्थगिती का दिली? उद्धव ठाकरेंचा सवाल
न्यासा भूखंड घोटाळ्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. न्यायप्रविष्ट प्रकरणात हस्तक्षेप केल्याबद्दल कोर्टानं गंभीर ताशेरे ओढलेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. निर्णय योग्य होता, तर मग निर्णयाला स्थगिती का दिली? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

विरोधकांचे आरोप काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना नागपुरातील NITची जमीन बिल्डरांना कवडीमोल दरात देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. एकनाथ शिंदे यांनी तब्बल 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयांना दिल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित प्रकरण न्यायलयात गेलंय. विशेष म्हणजे याबाबतच्या एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर झालेल्या व्यवहारावर कोर्टानंही ताशेरे ओढल्याचा दावा विरोधकांनी केला. मंत्रिपदाचा दुरुपयोग करुन अनियमितता केल्यानं शिंदेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Shinde Accused of Plot Scam Uddhav Thackeray demanded for resigned check details on 20 December 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x