22 April 2025 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL
x

Tata Group IPO | टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO येणार, टाटा तिथे नो घाटा, कंपनीचा तपशील जाणून घ्या

Tata Group IPO

Tata Group IPO | शेअर बाजारात जे लोक IPO मध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मीडिया हाऊस रिपोर्टनुसार 2025 पर्यंत ऑनलाइन किराणा वितरण करणाऱ्या बिगबास्केट कंपनीचा IPO बाजारात लाँच होऊ शकतो. पुढील काळात टाटा उद्योग समूहातील अनेक कंपन्यांचे IPO बाजारात येऊ शकतात. टाटा टेक्नोलॉजीज, टाटा प्ले या कंपन्याचे IPO येण्याची बातमी देखील आली होती. दरम्यान टाटा उद्योग समूह ऑनलाइन किराणा वितरण करणाऱ्या बिगबास्केटचा आयपीओ आणण्याची तयारी करत आहे, अशी माहिती समोर येत आहे.

कंपनीची पुढील योजना :
Big Basket कंपनी सध्या खाजगी गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी संपूर्ण भारतभर आपला व्यवसाय विस्तार करण्याची योजना बनवत आहे. याशिवाय कंपनी आपली क्विक बिझनेस शाखा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. ही कंपनी अॅमेझॉन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला बाजारात तगडी स्पर्धा देऊ शकते असे पारेख यांनी म्हंटले आहे. कंपनीचे उच्च अधिक्रक पारेख यांनी सांगितले की, बिगबास्केट बीबी नाऊचा पुरवठा करणाऱ्या डार्क स्टोअर्सची संख्या वाढवत आहे. हा एक फास्ट कमर्शिअल प्रकार आहे जो अवघ्या 30 मिनिटांत आपल्या ग्राहकांना सर्व घरगुती वस्तू वितरीत करेल. ही कंपनी मार्च 2023 पर्यंत देशभरात 200 ते 300 आउटलेट सुरू करण्याचा विचार करत आहे.

बिगबास्केट कंपनी भारतात सध्या 55 शहरांमध्ये आपल्या सेवा देत आहे. पुढील काळात कंपनी आणखी 75 शहरांमध्ये आपला व्यापार विस्तार करण्याचा विचार करत आहे. या कंपनीची उपस्थिती सध्या 450 शहरात असून आणि पुढील वर्षी 2023 मध्ये 80 ते 100 शहरांपर्यंत वाढेल.

IPO लाँच करण्याची तयारी :
टाटा समूहाची ऑनलाइन किराणा वितरण कंपनी बिगबास्केट आपला IPO लाँच करण्याची तयारी करत आहे. अशी माहिती एका मीडिया हाऊस रिपोर्ट मधून समोर आली आहे. एका न्यूज चॅनल मुलाखतीत बिगबास्केटचे मुख्य वित्तीय अधिकारी विपुल पारेख यांनी माहिती दिली की,” बेंगळुरू स्थित Big Basket ही कंपनी पुढील 24 ते 36 महिन्यांत आपला IPO लाँच करेल. याआधी कंपनीने जास्तीत जास्त खाजगी फंड खाजगी गुंतवणूकदारांकडून उभारण्याचा विचार केला आहे. बिगबास्केटने आतपर्यंत विविध खाजगी फंड कंपन्यांद्वारे सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणी केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Group IPO of Big Basket check details on 22 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Tata Group IPO(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या