23 November 2024 4:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Reliance Infratel Share Price | मुकेश अंबानी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली कंपनी रिलायन्स इन्फ्राटेल विकत घेणार, स्टॉकचं काय होणार?

Reliance Infratel Share Price

Reliance Infratel Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सतत एकापाठोपाठ एक कंपन्या विकत घेत आहे. अलिकडेच रिलायन्सच्या रिटेल कंपनीने मेट्रो इंडिया 2850 कोटी रुपयांना विकत घेतली, तर आता मुकेश अंबानी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली कंपनी रिलायन्स इन्फ्राटेल विकत घेणार आहेत. रिलायन्स जिओचे युनिट रिलायन्स प्रोजेक्ट्स अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंटने रिलायन्स इन्फ्राटेलमधील १०० टक्के हिस्सा ३७२० कोटी रुपयांना खरेदी केला आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने रिलायन्स कम्युनिकेशनचा १०० टक्के टॉवर आणि फायबर उत्पादन युनिट रिलायन्स इन्फ्राटेक विकत घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठीची बोली 2019 सालीच लावण्यात आली होती.

एनसीएलटीकडून हिरवा कंदील – Reliance Communications Share Price
एनसीएलटीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता या कंपनीचे अधिग्रहण रिलायन्स जिओच्या हाती येणार आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सची कमान मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या हातात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीवर प्रचंड कर्ज आणि तोटा सहन करावा लागत आहे. बराच वेळ ते कंपनी विकण्याच्या तयारीत होते. रिलायन्स इन्फ्राटेकने आरपीपीएमएसएलला १० रुपये दर्शनी मूल्य असलेले ५० लाख इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे. याशिवाय कंपनीने 372 कोटी रुपयांचे झीरो कूपन जारी केले आहेत.

मोबाइल मालमत्ता आणि ४३५४० मोबाइल टॉवर – Reliance Infratel Stock Price
आरआयटीएलकडे देशभरात १.७८ लाख रूट किलोमीटर मोबाइल मालमत्ता आणि ४३५४० मोबाइल टॉवर आहेत. अनिल अंबानी या सेलमधून पैसे आपल्या लेनदारांना परत करणार आहेत. अनिल अंबानी यांची आणखी एक कंपनी काल विकली गेली आहे. अनिस अंबानी यांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या रिलायन्स कॅपिटलची विक्री ८६०० कोटी रुपयांना झाली. ही कंपनी हिंदुजा ग्रुपने विकत घेतली आहे. सर्वात मोठी बोली लावणाऱ्या हिंदुजा ग्रुपने बुधवारी ही कंपनी विकत घेतली. लिलावासाठी या कंपनीची फ्लोअर व्हॅल्यू ६५०० कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती.

जिओला किती फायदा
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या कंपनीला खरेदी करून रिलायन्स जिओला त्याच्या नेटवर्क विस्तारात फायदा होणार आहे. देशातील प्रत्येक गावापर्यंत जिओची पोहोच वाढवण्यातही मोठी मदत होणार आहे. रिलायन्स इन्फ्राटेककडे मोबाइल टॉवर्स आणि फायबरचे विस्तृत जाळे आहे. अशा परिस्थितीत, जिओ या नेटवर्कचा वापर खेड्यांच्या आणि शहरांच्या विविध भागात पोहोचण्यासाठी करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Reliance Infratel Share Price after Mukesh Ambanis Reliance Jio acquire check details on 23 December 2022.

हॅशटॅग्स

#Reliance Infratel Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x