22 November 2024 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Mutual Fund SIP | होय! बँकेच्या वार्षिक व्याजापेक्षा या म्युचुअल फंड योजना 6 पट परतावा देतं आहेत, योजनांचा तपशील पहा

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | 2022 या वर्षात इक्विटी मार्केटमध्ये जबरदस्त चढ-उतार आणि गोंधळ पाहायला मिळाला होता. मात्र या वर्षाच्या अखेरीस शेअर बाजारात पुन्हा तेजी आली आणि बाजार विक्रमी पातळीवर गेला. या वर्षी इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मिडकॅप फंड श्रेणीमध्ये असे अनेक म्युचुअल फंड योजना आहेत, ज्यानी मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 20 ते 25 टक्के परतावा कमवून दिला आहे. यापैकी काही योजनानी तर वर्षानुवर्षे जबरदस्त कामगिरी केली आहे. 1 वर्ष, 3 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे किंवा 15 वर्षे, या कालावधीत ही या म्युचुअल फंड योजनांची कमालीचा परतावा दिला आहे. आज या लेखात आपण अशाच काही योजनांची माहिती घेणार आहोत.

श्रेणी निहाय परतावा :
2022 या वर्षात इक्विटी म्युच्युअल फंडांच्या मल्टीकॅप श्रेणीने 13.4 टक्के परतावा दिला आहे. लार्जकॅप श्रेणीने 7.0 टक्के, लार्ज आणि मिडकॅप श्रेणीने 7.6 टक्के, मिडकॅप श्रेणी 10.6 टक्के, स्मॉलकॅप श्रेणीने 9.3 टक्के, ELSS 12 टक्के, आणि सेक्टर ल फोकस म्युचुअल फंडने 8.4 टक्के परतावा कमावून दिला आहे.

क्वांट मिडकॅप फंड :
या मिडकॅप म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल कॅप योजनेने मागील 3 वर्षांत लोकांना 36 टक्के, 5 वर्षात 19 टक्के, 10 वर्षांत 16 टक्के, आणि 15 वर्षात 10 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. 15 वर्षापूर्वी ज्या लोकांनी यात 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 4.17 लाख रुपये मिळाले असणार. ज्यां लोकांनी या स्कीममध्ये 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 67 लाख झाले आहे.

* एकूण मालमत्ता : 1273 कोटी रुपये
* किमान गुंतवणूक : 5000 रुपये
* किमान SIP रक्कम : 1000 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 2.68 टक्के

एचडीएफसी मिडकॅप फंड :
HDFC मिडकॅप म्युचुअल फंड स्कीमने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के, 5 वर्षांत 11 टक्के, 10 वर्षांत 19 टक्के आणि 15 वर्षांत 15 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. गेल्या 15 वर्षात ज्या लोकांनी या स्कीममध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 8.30 लाख रुपये रिटर्न्स मिळाले आहेत. ज्या लोकांनी या स्कीममध्ये 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 15 वर्षांत 93 लाख झाले आहे.

* एकूण मालमत्ता : 36,158 कोटी रुपये
* किमान गुंतवणूक रक्कम : 100 रुपये
* किमान SIP गुंतवणूक रक्कम : 100 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 1.60 टक्के

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड :
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या 5 वर्षांत 14 टक्के, 10 वर्षात 16%, 15 वर्षांत 12% परतावा कमावून दिला आहे. गेल्या 15 वर्षापूर्वी ज्या लोकांनी यात 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 5.22 लाख रुपये मिळाले असणार. आणि ज्या लोकांनी या योजनेत 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 70.30 लाख रुपये झाले आहेत.

* एकूण मालमत्ता: 13,861 कोटी रुपये
* किमान गुंतवणूक : 100 रुपये
* किमान SIP रक्कम : 100 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 1.59 टक्के

सुंदरम मिडकॅप फंड :
सुंदरम मिडकॅप फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने गेल्या 5 वर्षांत 7 टक्के, 10 वर्षांत 16 टक्के आणि 15 वर्षात 12 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 15 वर्षापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 5.47 लाख रुपये परतावा मिळाला असणार. ज्या लोकांनी या स्कीममध्ये 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 71 लाख झाले आहे.

* एकूण मालमत्ता : 7474 कोटी
* किमान गुंतवणूक रक्कम : 100 रुपये
* किमान SIP रक्कम : 100 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 1.88 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund Scheme which has given huge returns in 2022 years to investors on 23 December 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(244)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x