24 November 2024 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची
x

प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

Pramod sawant, Chief Minister of Goa

पणजी : मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत झालेली राजकीय खलबतं, दीर्घ चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काल रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी प्रमोद सावंत यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, प्रमोद सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक, निलेश काब्राल यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत गोव्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच कांग्रेसने केलेला सत्तास्थापनेचा दावा आणि भाजपाचे सहकारी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि मगोच्या नेत्यांनी ताठर भूमिका घेतल्याने सत्तास्थापनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, महाराष्ट्र गोमंतक आणि गोवा फॉरवर्डच्या नेत्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची अट मान्य झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x