22 November 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

VIDEO | दिशा सालियान प्रकरणी CBI'ची 72 दिवसांनी एंट्री झाल्याचे नितेश राणेंनी म्हटलेले, 24 मार्चची ती राजकीय नौटंकी होती?

Disha Salian Case

Disha Salian Death Case | दिशा सालियान प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरण एकमेकांशी जोडलेलं असल्याचा आरोप राणे कुटुंबाकडून करण्यात येत होता, तसंच सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करताना सीबीआयने दिशा सालियानच्या मृत्यूचीही चौकशी केल्याचा दावा केला गेला, पण याबाबत आता सीबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे.

सीबीआयने दिशा सालियान प्रकरणाचा तपास केला नाही, कारण ही केस सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आलेली नव्हती. या प्रकरणाची सीबीआयने चौकशी केल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असं सीबीआयने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनामध्येही दिशा सालियान प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आक्रमक झाले, यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची घोषणा सभागृहात केली, तसंच दिशा सालियान प्रकरण सीबीआयकडे नव्हतं. सीबीआयकडे फक्त सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण होतं, असं फडणवीस यांनी सांगितलं.

नितेश राणेंनी CBI या प्रकरणात दाखल झाल्याचे म्हटले होते :
मात्र, दिशा सालियान प्रकरणी CBI निष्कर्षांचं वृत्त देशभर २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विटरवरून लिहिले की, “दिशाच्या प्रकरणात सीबीआयने केलेल्या निरीक्षणांसाठी मी त्यांना दोष देत नाही. सीबीआय ७२ दिवसांनंतर दाखल. 8 जूनपासून महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने “क्लीन अप” इतके चांगले केले गेले की सीबीआयने प्रवेश केला तोपर्यंत फारसे काहीही रिकव्हर केले जाऊ शकले नाही. माष्टर ऑफ ऑल कव्हर-अप्स!

VIDEO – केस CBI कडे नव्हती हे माहिती होतं तर ती नौटंकी होती ?
केस CBI नव्हती तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत राजकीय नौटंकी केली होती का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. कारण 24 मार्च २०२२ रोजी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधासभेत ऑन रेकॉर्ड म्हटले होते की, “दिशा सालियनची आत्महत्या नव्हे हत्याच झाली याचा पुरावा आहे…. लवकरच कोर्टाच्या माध्यमातून CBI कडे pen drive देणार..”

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CBI clarification over Actor Sushant Singh Rajput Manager Disha Salian death case on 24 December 2022.

हॅशटॅग्स

#Disha Salian Case(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x