22 November 2024 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 5 दिवसात या शेअर्सनी 91 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, कोणते स्टॉक नोट करा

Multibagger Stocks

Multibagger Stock | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. 23 डिसेंबर 2022 रोजी शेअर बाजारात 2.5 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती, जी जून 2022 नंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण होती. नकारात्मक जागतिक संकेत, आर्थिक मंदीची भीती, यूएस फेडरल रिझर्व्हकडून धोरण आणखी कडक होण्याची शक्यता आणि अनेक देशांमध्ये वाढता कोरोना प्रकोप यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज US आणि युरोपियन शेअर बाजार बंद असल्यामुळे भारतीय शेअर बाजार हिरव्या निशाणीवर व्यवहार करत आहे.

1 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक मार्केट विक्रमी उच्चांक पातळीवर ट्रेड करत होता, तर मागील आठवड्यात शेअर बाजारात 6 टक्क्यांची घसरण झाली होती. अवघ्या एका आठवड्यात सेन्सेक्स निर्देशांक 1500 अंकांनी घसरून 59,845 वर पोहचला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 462 अंकांच्या घसरणीसह 17,807 वर पोहचला होता. फार्मा सेक्टर सोडून इतर सर स्टॉक कोसळले होते. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात 6 टक्क्यांची घसरण झाली होती, तर स्मॉलकॅप 100 निर्देशांक 8 टक्क्यांपेक्षा जास्त पडला होता. शेअर बाजार कोसळला असताना देखील असे 5 शेअर्स होते जे हिरव्या निशाणी वर ट्रेड करत होते. आज आपण या स्टॉक ची माहिती पाहणार आहोत.

Pradhin Limited :
प्राधिन लिमिटेड ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 19.21 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 91.45 टक्क्यांचा जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. हा शेअर मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 27.50 रुपयांवरून 52.65 रुपयांवर पोहोचला आहे. आज या कंपनीचे शेअर्स 3.89 टक्क्यांच्या घसरणीसह 50.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या स्टॉकने 91.45 टक्क्यांच्या परताव्यासह आपल्या गुंतवणूकदाराना 1 लाख रुपयेवर 1.91 लाख परतावा कमावून दिला आहे. मात्र स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

भारत इम्युनोलॉजिस्ट :
भारत इम्युनोलॉजिस्टने कंपनीच्या शेअर्सनी मागील आठवड्यात आपल्या शेअर धारकांना बंपर प्रॉफिट कमावून दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर 27.90 रुपये किमतीवरून 44.85 रुपयांवर पोहोचले आहेत. काही दिवसात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 60.75 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आज या कंपनीचे शेअर्स 9.92 टक्क्यांच्या वाढीसह 49.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 193.66 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसात या स्टॉकने लोकांना 60.75 टक्के परतावा मिळवून दिला आहे, जो FD आणि RD सारख्या इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा अनेक पटीनी जास्त आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 44.85 रुपयांवर क्लोज झाले होते, तर आज हा स्टॉक 49.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हायब्रीड फायनान्शियल :
हायब्रीड फायनान्शियल कंपनीच्या शेअर्सनी देखील आपल्या शेअर धारकांना बंपर प्रॉफिट मिळवून दिला आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 46.56 टक्के परतावा कमावून दिला आहे. एका आठवड्यात हा स्टॉक 18.58 रुपयांवरून 27.23 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या काही दिवसात 46.56 टक्के प्रॉफिट मिळवून दिला आहे. आज या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के कमजोरीसह 25.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 80.15 कोटी रुपये आहे.

एचएस इंडिया :
एचएस इंडिया कंपनीच्या स्टॉकनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. एका आठवड्यात हा स्टॉक 11.38 रुपयांवरून 16.37 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्समधून गुंतवणूकदारांनी अवघ्या काही दिवसात 43.85 टक्के परतावा कमावला आहे. आज कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के कमजोरीसह 14.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 26.58 कोटी रुपये आहे.

Godavari Drugs Ltd :
गोदावरी ड्रग्ज कंपनीच्या शेअर्सनेही मागील एका आठवड्यात आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स एका आठवड्यात 63.20 रुपयांवरून 89.95 रुपयांवर पोहोचले आहेत. या कंपनीच्या शेअर्स नी अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना 42.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के वाढीसह 89.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 67.21 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks given huge returns on investment on 26 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x