18 November 2024 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

आगामी 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका, देशातील 'त्या' सर्वोच्च गुप्तचर यंत्रणेच्या सर्व्हे रिपोर्टने मोदी-शहांची झोप उडाल्याचं वृत्त

Upcoming 9 States Assembly Elections

Upcoming 9 States Assembly Elections | नुकत्याच गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिका पार पडल्या. त्यात गुजरात भाजपने राखलं कारण ते मोदींचं होम टाऊन होतं. मात्र हिमाचल प्रदेशात सत्तांतर होतं, मतदारांनी भाजप सरकारला नाकारून काँग्रेसच्या हातात सत्ता दिली. तर दुसरीकडे, दिल्ली एमसीडीची सत्ता आप कडे जाऊन तेथे भाजपच्या सत्तेला मतदारांनी सुरुंग लावत सत्तांतर घडवल्याचं पहायला मिळालं आहे.

भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची आत्तापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. 2023 मध्ये ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मिझोराम व्यतिरिक्त राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा सारख्या मोठ्या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र याच अनुषंगाने भाजपने सत्तेच्या बळावर देशातील सर्वात मोठ्या गुप्तचर यंत्रणेकडून आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एक अत्यंत महत्वाचा सर्व्हे करून घेतला असून, त्यासंदर्भातील एक सर्विस्तर रिपोर्ट भाजपच्या वरिष्ठांना सुपूर्द करण्यात आल्याचं खात्रीलायक वृत्त दिल्लीतील एका वरिष्ठ पत्रकाराने भाजपच्या मोठ्या नेत्याच्या नेटवर्क मधून दिलं आहे. खुद्द राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेतील एका मोठ्या अधिकाऱ्याने हा रिपोर्ट बनविण्यासाठी मुख्य भूमिका बजावल्याची माहिती आहे. दिल्लीत पत्रकारांमध्ये या रिपोर्टची जोरदार चर्चा सुरु झाली असली तरी या रिपोर्टनंतर मोदी-शहांची झोप उडाल्याचं म्हटलं जातंय.

रिपोर्टनंतर झोप उडण्याचं कारण काय?
या महत्वाच्या उच्च पातळीवरील सर्व् नुसार आगामी ९ राज्यातील विधानसभा निवडणुकीपैकी ४ प्रमुख राज्यांमध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता राखणार असल्याचं सांगण्यात आलं आहे आणि दुसरीकडे, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यांमध्ये भाजपचा मोठ्या फरकाने पराभव होईल असं म्हटलं गेलंय. याची सविस्तर कारणं देखील या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली आहेत. तसेच तेलंगणातील केसीआर सरकारने जमिनीवर सामान्य लोकांशी निगडित मोठं काम केल्याने टीआरएस या निवडणुका एकतर्फी जिंकेल असं स्पष्ट म्हटलं आहे.

यामध्ये महाराष्ट्रात काय होणार याचाही उल्लेख :
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ लांब असला तरी या सर्व्हे रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील भाकीत देखील मागविण्यात आलं आहे, मात्र ते लोकसभा निवडणुकीसंदर्भात. त्यानुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात केवळ ५-६ एवढ्याच जागा मिळतील असं म्हटलं गेलंय. तसेच शिंदे गट फुटीचा भाजपाला काहीच फायदा होणार नसून उलट शिवसेना फोडल्याने महाराष्ट्रातील मतदार हा फडणवीसांवर प्रचंड नाराज असल्याचं म्हटलं गेलंय आणि राज्यातील लोकांचा मोदी-शहांवर विश्वास नसल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला होणार असल्याचं म्हटलं गेलंय. याच रिपोर्टनंतर भाजपने अनेक बैठकांचा सपाटा लावला आणि शिंदे-फडणवीसांच्या दिल्लीवाऱ्या त्याचाच कारण असल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Upcoming 9 States Assembly Elections Secret Survey report check details on 27 December 2022.

हॅशटॅग्स

#Upcoming 9 States Assembly Elections(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x