19 April 2025 7:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Post Office Scheme | लहान मुलांसाठी पोस्ट ऑफिस योजना, दररोज 6 रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीवर मिळवा 1 लाख रुपये

Post Office Scheme

Post Office Scheme | आजकालच्या महागाईच्या काळात मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी बक्कळ पैसा लागतो. जर तुम्हाला तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही मुलांच्या जन्मापासूनच गुंतवणुक सुरू करायला पाहिजे. अशा अनेक सरकारी योजना आहेत, जे तुम्हाला मुलांच्या शिक्षणापासूनते लग्नापर्यंत सर्व खर्चासाठी पैसे जमा करण्याची सुविधा देतात. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक योजना तुमच्यासाठी फायदेशीर पर्याय ठरू शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत, जी तुमचे सर्व आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करू शकते. पोस्ट ऑफीसच्या या योजनेचे नाव आहे, बाल जीवन विमा योजना. या योजनेत तुम्ही दररोज 6 रुपये जमा करून तुमच्या मुलाला करोडपती बनवू शकता. कसे? चला तर मग जाणून घेऊ सविस्तर

मुलांसाठी तयार करण्यात आलेली खास योजना :
पोस्ट ऑफीस तर्फे लहान मुलांसाठी “बाल जीवन विमा योजना” राबवली जाते. ही योजना खास मुलांना विचारात घेऊन तयार करण्यात आली आहे. पालक आपल्या मुलांसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकता. बाल जीवन विमा योजनेत तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने गुंतवणूक करू शकता. बाल जीवन विमा योजनेत एका कुटुंबातील फक्त दोन मुलांच्या नावाने गुंतवणूक करता येते. ज्या पालकांचे वय 45 वर्षांपेक्षा अधिक आहे, ते आपल्या मुलांसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही.

योजनेची वयोमर्यादा आणि प्रीमियम :
बालजीवन विमा योजनेत तुम्ही तुमच्या 5 ते 20 वर्ष वयोगटातील मुलांसाठी गुंतवणूक करू शकता. तुम्ही या योजनेत 1, 3, 6, 12 महिन्यांच्या आधारे प्रीमियम भरू शकता. या योजनेत रुखी दररोज किमान 6 रुपयांपासून कमाल 18 रुपयांपर्यंतचा प्रीमियम भरू शकता. जेव्हा तुमच्या मुलांच्या नावावर असलेली ही बाल जीवन विमा योजना परिपक्व होईल तेव्हा तुमच्या मिळाला 1 लाख रुपये विमा रकमेचा लाभ दिला जाईल.

योजनेची वैशिष्ट्ये :
बाल जीवन विमा योजनेत एका कुटुंबातील फक्त 2 मुलांना लाभ घेता येतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या मुलांचे किमान वय 5 आणि कमाल 20 वर्षे दरम्यान असावे. पॉलिसी खरेदी करताना पालकांचे वय 45 वर्षांपेक्षा अधिक असू नये. जर पॉलिसीधारकाचे पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी निधन झाले, तर मुलाला पॉलिसीसाठी कोणतेही प्रीमियम भरावे लागणार नाही. पॉलिसीची मुदत संपल्यावर पॉलिसीची संपूर्ण मॅच्युरिटी रक्कम मुलाला दिली जाईल. या योजनेत 1,000 रुपयांच्या प्रीमियमवर वार्षिक 48 रुपये बोनस लाभ दिला जाईल.

गुंतवणूक सुरू करण्याची प्रक्रिया :
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्हाला या अर्जात तुमच्या मुलांचे विविध तपशील आणि माहिती भरावी लागेल. जसे मुलांचे नाव, वय आणि पत्ता अशी इतर माहिती आणि तपशील फॉर्ममध्ये नमूद करावी लागेल. यासोबतच अर्जात पॉलिसीधारकाची माहितीही भरावी लागेल. अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

Post Office Scheme

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post Office Scheme of Bal Jeevan Vima Policy for Children on 25 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(231)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या