24 April 2025 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल EPFO Money News | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो तुमची बेसिक सॅलरी किती? खात्यात इतकी रक्कम जमा होणार, अपडेट पहा Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा Horoscope Today | 25 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रावरचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रावरचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 25 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | इरेडा शेअरबाबत महत्वाचे संकेत; मल्टिबॅगर स्टॉकची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

Yes Bank Share Price | होय! 20 रुपयांचा येस बँकेचा शेअर इतिहास रचणार, खरेदी करून स्वतःच आयुष्य बदलणार?

Yes Bank share price

Yes Bank Share Price | डिसेंबर 2022 च्या शेवटच्या आठवड्यात येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने जेसी फ्लॉवर्स एआरसीकडे एनपीएचे हस्तांतरण केले आहे. मात्र 15 डिसेंबर 2022 नंतर Yes Bank शेअरमध्ये किंचित घसरण पहायला मिळाली होती, मात्र त्यानंतर स्टॉकमध्ये सुधारणा झाली. पुन्हा एकदा या खासगी बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. आज Yes Bank चे शेअर्स 2.73 टक्के वाढीसह 20.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारात चढ-उतार असताना 2023 मध्ये येस बँकेचे शेअर्स वाढतील की नाही हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

येस बँकेच्या शेअर्सबद्दल तज्ञांचे मत :
तज्ञांच्या मते Yes Bank शेअर्स 2023 या नवीन वर्षात कशी कामगिरी करतील हे पूर्णपणे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील निकालावर अवलंबून राहील. येस बँक चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत आपली तरतूद कमी करेल, यामुळे येस बँकेचे मार्जिन झपाट्याने वाढून ही खाजगी बँक नफ्यात येईल, असे तज्ञांना वाटते. पुढील 6 ते 9 महिन्यांत येस बँकेचे शेअर्स 40 ते 50 रुपये किमतीवर जाऊ शकतात, असे तज्ञांना वाटते.

GCL सिक्युरिटीजचे तज्ञ म्हणतात की,“ Yes Bank शेअरची कामगिरी बऱ्याच प्रमाणात तिसऱ्या तिमाहीच्या निकालावर अवलंबून राहील. या खाजगी क्षेत्रातील बँकेने इतर व्यापारी बँकांप्रमाणेच काम केल्यास हे शेअर्स जबरदस्त किमतीवर जाऊ शकतात. जर पुढील काळात येस बँकेचे तिमाही निकाल सकारात्मक राहिले, आणि शेअरची किंमत वाढली तर विद्यमान शेअर धारकांनी प्रॉफिट बुकिंग करु नये. चांगल्या त्रैमासिक निकालांमुळे येस बँकेचे शेअर्स 40 ते 45 रुपयांवर जाऊ शकतात, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

2023 मध्ये येस बँकेची लक्ष्य किंमत :
पुढील 6 ते 9 महिन्यांचा अंदाज घेतला तर येस बँकेचे शेअर्स 50 रुपये किमतीवर जाऊ शकतात. चॉईस ब्रोकिंग फर्मचे म्हणणे आहे की, ” जर तुम्ही येस बँक शेअर सध्याच्या किंमत पातळीवर खरेदी करत असाल तर त्यावर 17 रुपयेचा स्टॉप लॉस लावून 24 रुपये या लक्ष किमती साठी स्टॉक होल्ड करावा”. पुढील काळात येस बँक शेअर्स 40 रुपये किंमत स्पर्श करेल याबाबत शेअर बाजारातील अनेक तज्ञ सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank share price ready to achieve New target price in New year after 28 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या