23 November 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537
x

Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! 290 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या 5 शेअर्सची लिस्ट, तुम्ही पैसा वाढवणार का?

Multibagger Stocks

Multibagger Stocks| सर्वात आधी कोरोना महामारी आली जी मागील 100 वर्षांतील सर्वात मोठी महामारी होती, नंतर भारत-चीन डॉकलाम स्टँड ऑफ, आता रशिया आणि युक्रेन युद्ध या सर्व कारणांमुळे मागील काही वर्षांपासून शेअर बाजार अस्थिर झाला आहे. 2022 हा वर्ष गुंतवणूकदारांसाठी फारसे चांगला गेला नाही. मात्र या कठीण काळातही अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या शेअरधारकांना मालामाल केले आहे. आज या लेखात आपण अशा 5 स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्स माहिती घेणार आहोत, ज्यानी 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 290 टक्क्यांपर्यंत अद्भूत परतावा मिळवून दिला आहे.

1) Cressanda Solutions :
2022 या वर्षात Cressanda Solutions कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 292 टक्क्यांचा छप्पर फाड परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 19 टक्के नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 51.20 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 4.78 रुपये होती. आज या कंपनीचे शेअर्स 0.75 टक्के वाढीसह 26.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2) चॉईस इंटरनॅशनल :
या स्मॉल कल कंपनीचे शेअर्स 2022 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारी 2022 रोजी 63.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 1.59 टक्के वाढीसह 243.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच 2022 या वर्षाच्या सुरुवातीला ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 279.41 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 299 रुपये होती.

3) BLS इंटरनॅशनल :
या कंपनीच्या स्टॉकनेही 2022 या वर्षात आपल्या स्थितीगत गुंतवणूकदारांना 270 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 208 रुपये होती. तर 52 आठवड्याची नीचांक किंमत पातळी 44.86 रुपये होती. आज हा स्टॉक 1.35 टक्के घसरणीसह 171.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

4) Jyoti Resins and Adhesives Ltd :
या कंपनीचे शेअर आज 4.78 टक्के वाढीसह 1299 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सनी या वर्षात आपल्या शेअर धारकांना 232 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1818.45 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 323 रुपये होती.

5) उगार शुगर वर्क्स :
या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 2022 मध्ये आतापर्यंत 224 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 8.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज हा स्टॉक 2.86 टक्के घसरणीसह 99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks has given huge returns in 2022 year to shareholders before 28 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x