23 November 2024 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Penny Stock | अबब! या शेअरने 17722 % परतावा देत 56500 रुपये गुंतवणुकीचे 1 कोटी केले, स्टॉक आजही हिट

Multibagger Penny Stock

Multibagger Penny Stock | शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्या लोकांना भरघोस परतावा मिळतो, आणि अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यनी आपल्या गुंतवणूकदारांना वर्षानुवर्षे अद्भूत परतावा मिळवून दिला आहे. अशा पेनी स्टॉकमुळे काही हजारांची रक्कम करोडोपर्यंत वाढू शकते, पण त्यासाठी बराच कालावधी लागतो. जर तुम्ही गुंतवणूक करून संयम राखला तर दीर्घकाळात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. आज या लेखात आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका कंपनीच्या शेअर माहिती देणार आहोत, दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये लावलेली अल्प गुंतवणूक आता 1 कोटींमध्ये रूपांतरित झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Caplin Point Laboratories Share Price | Caplin Point Laboratories Stock Price | BSE 524742 | NSE CAPLIPOINT)

कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज :
कॅपलिन पॉईंट कंपनीच्या शेअर्सने मागील 27 वर्षात इतका परतावा दिला की, गुंतवणूकदार आता करोडपती झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी 14 जुलै 1995 पासून आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 17,722.50 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 14 जुलै 1995 रोजी या कंपनीचे शेअर बीएसई इंडेक्सवर 4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 0.49 टक्के घसरणीसह 709.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 178 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकने अवघ्या 56500 रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा दिला आहे.

10 वर्षात मिळालेला परतावा :
21 डिसेंबर 2012 रोजी या कंपनीचे शेअर्स फक्त 14.03 रुपयांवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 709 रुपयांवर पोहचला आहे. या काळात Caplin india Lab कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 4981.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. यासह 1 लाख रुपये गुंतवणुकीवर या स्टॉकने लोकांना 10 वर्षांत 50 लाख रुपये नफा दिला आहे. मागील 5 वर्षात या शेअर ने लोकांना फक्त 13.40 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनीच्या शेअरमध्ये मागील एका वर्षात 12.30 टक्के घट झाली आहे. 2022 मध्ये हा स्टॉक 18.21 टक्के पडला आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने लोकांना 0.3 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 6.03 टक्क्यांनी खाली आली आहे. गेल्या 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 3.87 टक्के पडली आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 888.45 रुपये होती, तर नीचांक किंमत पातळी 626.30 रुपये होती.

कंपनीचा व्यापार आणि बाजार भांडवल :
कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनीचा मार्केट कॅप 5,412.16 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कॅपलिन पॉइंट ही कंपनी आपले उत्पादन लॅटिन अमेरिका, फ्रँकोफोन आफ्रिकेत, यूएस आणि ईयू सारख्या बाजारपेठांमध्ये विक्री करते. कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनी विकसित बाजारपेठांमध्ये आपले उत्पादन झपाट्याने निर्यात करणारी एकात्मिक फार्मास्युटिकल कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीची स्थापना 1990 साली झाली होती. कंपनी मुख्यतः मलम, क्रीम आणि इतर बाह्य ऍप्लिकेशन्सची निर्मिती करते.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनीचे उत्पन्न 24 टक्क्यांनी वाढून 3.76 अब्ज रुपयेवर पोहचले आहे. यातून कंपनीने 91.67 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 22 टक्क्यांनी अधिक आहे. तज्ञांना विश्वास आहे की, या कंपनीचे उत्पन्न पुढील काही वर्षात 17 टक्क्यांनी वाढेल, आणि याचा फायदा गुंतवणुकदारांना होईल. पुढील काही वर्षात भारतातील फार्मास्युटिकल्स उद्योगात 11 टक्के वाढ अपेक्षित आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Penny Stock of Caplin Point Laboratory share price return on investment on 28 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x