Multibagger Penny Stock | अबब! या शेअरने 17722 % परतावा देत 56500 रुपये गुंतवणुकीचे 1 कोटी केले, स्टॉक आजही हिट
Multibagger Penny Stock | शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्या लोकांना भरघोस परतावा मिळतो, आणि अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यनी आपल्या गुंतवणूकदारांना वर्षानुवर्षे अद्भूत परतावा मिळवून दिला आहे. अशा पेनी स्टॉकमुळे काही हजारांची रक्कम करोडोपर्यंत वाढू शकते, पण त्यासाठी बराच कालावधी लागतो. जर तुम्ही गुंतवणूक करून संयम राखला तर दीर्घकाळात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका कंपनीच्या शेअर माहिती देणार आहोत, दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये लावलेली अल्प गुंतवणूक आता 1 कोटींमध्ये रूपांतरित झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Caplin Point Laboratories Share Price | Caplin Point Laboratories Stock Price | BSE 524742 | NSE CAPLIPOINT)
कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज :
कॅपलिन पॉईंट कंपनीच्या शेअर्सने मागील 27 वर्षात इतका परतावा दिला की, गुंतवणूकदार आता करोडपती झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी 14 जुलै 1995 पासून आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 17,722.50 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 14 जुलै 1995 रोजी या कंपनीचे शेअर बीएसई इंडेक्सवर 4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 0.49 टक्के घसरणीसह 709.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 178 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकने अवघ्या 56500 रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा दिला आहे.
10 वर्षात मिळालेला परतावा :
21 डिसेंबर 2012 रोजी या कंपनीचे शेअर्स फक्त 14.03 रुपयांवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 709 रुपयांवर पोहचला आहे. या काळात Caplin india Lab कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 4981.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. यासह 1 लाख रुपये गुंतवणुकीवर या स्टॉकने लोकांना 10 वर्षांत 50 लाख रुपये नफा दिला आहे. मागील 5 वर्षात या शेअर ने लोकांना फक्त 13.40 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनीच्या शेअरमध्ये मागील एका वर्षात 12.30 टक्के घट झाली आहे. 2022 मध्ये हा स्टॉक 18.21 टक्के पडला आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने लोकांना 0.3 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 6.03 टक्क्यांनी खाली आली आहे. गेल्या 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 3.87 टक्के पडली आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 888.45 रुपये होती, तर नीचांक किंमत पातळी 626.30 रुपये होती.
कंपनीचा व्यापार आणि बाजार भांडवल :
कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनीचा मार्केट कॅप 5,412.16 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कॅपलिन पॉइंट ही कंपनी आपले उत्पादन लॅटिन अमेरिका, फ्रँकोफोन आफ्रिकेत, यूएस आणि ईयू सारख्या बाजारपेठांमध्ये विक्री करते. कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनी विकसित बाजारपेठांमध्ये आपले उत्पादन झपाट्याने निर्यात करणारी एकात्मिक फार्मास्युटिकल कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीची स्थापना 1990 साली झाली होती. कंपनी मुख्यतः मलम, क्रीम आणि इतर बाह्य ऍप्लिकेशन्सची निर्मिती करते.
कंपनीची आर्थिक कामगिरी :
चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज कंपनीचे उत्पन्न 24 टक्क्यांनी वाढून 3.76 अब्ज रुपयेवर पोहचले आहे. यातून कंपनीने 91.67 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 22 टक्क्यांनी अधिक आहे. तज्ञांना विश्वास आहे की, या कंपनीचे उत्पन्न पुढील काही वर्षात 17 टक्क्यांनी वाढेल, आणि याचा फायदा गुंतवणुकदारांना होईल. पुढील काही वर्षात भारतातील फार्मास्युटिकल्स उद्योगात 11 टक्के वाढ अपेक्षित आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Penny Stock of Caplin Point Laboratory share price return on investment on 28 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार