8 September 2024 7:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

Titagarh Wagons Share Price | मस्तच! 6 महिन्यांत 108% परतावा, हा शेअर खुद्द कंपनी प्रमोटर्स खरेदी करत आहेत, स्टॉक तेजीचे संकेत

Titagarh Wagons Share Price

Titagarh Wagons Share Price | टिटागढ वॅगन्स या रेल्वे वॅगन निर्माता कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 2.23 टक्क्यांच्या वाढीसह 218 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स गुरुवारी 207 रुपये किमतीवर पोहचले आहेत. कंपनीच्या प्रवर्तक समूहाने 2.09 लाख शेअर्स खरेदी केल्यानंतर टिटागढ वॅगन्स कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. गुरुवार (२९ डिसेंबर २०२२) रोजी हा शेअर 2.98% घसरून 207 रुपयांवर वर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titagarh Wagons Share Price | Titagarh Wagons Stock Price | BSE 532966 | NSE TWL)

कंपनीच्या प्रमोटरची गुंतवणूक वाढ :
टिटागढ लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या प्रमोटर्सनी 14,44,011 इक्विटी शेअर्स खरेदी करून या कंपनीतील आपले भाग भांडवल 1.03 टक्के वरून 1.20 टक्के पर्यंत वाढवले आहे. काल दुपारी 12.47 वाजता या कंपनीचे शेअर्स 211.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे त्याच्या आदल्या दिवशीच्या 202.45 रुपये किमतीच्या तुलनेत 4.6 टक्के अधिक आहे. या कंपनीचे शेअर्स मागील सहा महिन्यांत सुमारे 108 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. तर 2022 या वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 122 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आज सकाळी 10:00 वाजता या कंपनीचे शेअर्स 218 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. दिलासादायक गोष्ट अशी की, शेअर बाजारात कमजोरी असताना ही हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे.

गुंतवणुक तज्ञांचे मत :
ट्रेंडलाइन डेटानुसार स्टॉक मार्केट तज्ञांनी या स्टॉकची पुढील टार्गेट किंमत 206 रुपये निश्चित केली आहे, जी सध्याच्या बाजार भावाच्या तुलनेत 3 टक्के कमी आहे. याचा अर्थ तज्ञांना या स्टॉक मध्ये पुढील काळात पडझड होईल असे वाटते. Titagarh Wagons या कंपनीच्या शेअर्ससाठी स्टॉक मार्केट विश्लेषक ‘ बाय ‘ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तांत्रिकदृष्ट्या टिटागड वॅगन्स 8 पैकी 8 SMAs/सिंपल मूव्हिंग अॅव्हरेजवर ट्रेड करत आहेत. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत या कंपनीच्या प्रवर्तक गटाकडे 46.26 टक्के भाग भांडवल होल्ड करत होते. तर म्युच्युअल फंडाकडे एकूण 6.82 टक्के भाग भांडवल होते. तर किरकोळ गुंतवणूकदारांची या कंपनीत 45.74 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
Titagarh Wagons या कंपनीची स्थापना 1997 साली झाली होती. ही एक Smallcap कंपनी असून अभियांत्रिकी उद्योग क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी भारत आणि इटलीमधील कारखान्यांद्वारे जागतिक बाजारपेठेत आपले उत्पादन पोहोचवते. कंपनी ट्रेन आणि मेट्रोसह प्रवासी रोलिंग स्टॉकची पूर्तता करते. टिटागड वॅगन्स कंपनी कंटेनर फ्लॅट्स, धान्य, सिमेंट, क्लिंकर आणि टँक वॅगन्सचे डिझाइन आणि उत्पादन करण्याचे काम करते. सध्या या कंपनीचे बाजार भांडवल 2,522 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titagarh Wagons Share Price return on investment check details on 29 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x