Hariom Pipes Industries Share Price | मजबूत शेअर, 8 महिन्यांत 160% परतावा, खिसे पैशाने भरणाऱ्या स्टॉकचे डिटेल्स आणि मोठी बातमी
Hariom Pipes Industries Share Price | हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 16 टक्के उसळी घेतली होती, आणि शेअरची किंमत बीएसई इंडेक्सवर 403 रुपये प्रति शेअर्स या विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचली होती. हे शेअर्स गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी 2.85 टक्के कमजोरीसह 356.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hariom Pipe Industries Share Price | Hariom Pipe Industries Stock Price | BSE 543517 | NSE HARIOMPIPE)
मालमत्ता हस्तांतरण करार
हरिओम पाईप इंडस्ट्रीज कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, आमच्या कंपनीने गॅल्वनाइज्ड पाईप आणि कोल्ड रोल्ड कॉइल बनवण्यासाठी ऑपरेटिंग मालमत्ता खरेदी करण्यासाठी R.P.Metal Sections Private Limited कंपनीसोबत 26 डिसेंबर 2022 रोजी मालमत्ता हस्तांतरण करार पूर्ण केला आहे. हे युनिट पेरुंडुराई तामिळनाडू या ठिकाणी SIPCOT औद्योगिक विकास केंद्रात 13.83 एकर जमिनीवर पसरले आहे. 55 कोटी रोख मोबदल्यात हा मालमत्ता हस्तांतरण करार पूर्ण करण्यात आला आहे. व्यवहाराचे उद्दिष्ट स्पष्ट करताना हरिओम पाईप्स कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे की, कंपनी अधिक मूल्यवर्धित उत्पादने जोडण्यासाठी उत्पादन श्रेणी वाढवण्याचा विचार करत आहे, आणि या मालमत्ता खरेदीमुळे कंपनीचे उत्पादन विस्ताराचे उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
आरपी मेटलकडून हरिओम पाइप इंडस्ट्रीजला मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी काही परवानग्या आणि मंजूरीची आवश्यकता आहे. आरपी मेटलला स्टेट इंडस्ट्रीज प्रमोशन कॉर्पोरेशन ऑफ तमिळनाडू कडून NOC घ्यावी लागणार आहे. हरिओम पाईप इंडस्ट्रीज कंपनीच्या नावाने लीज करार आणि इतर सर्व परवान्यांचे हस्तांतरण केले जाईल.
8 महिन्यांत 160 टक्केपेक्षा अधिक परतावा
या वर्षी एप्रिल 2022 मध्ये शेअर बाजारात पदार्पण करणार्या हरिओम पाईप या सूचीबद्ध झालेल्या कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या आठ महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 160 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या कंपनीने आपल्या IPO इश्यू मध्ये शेअरची किंमत 153 रुपये निश्चित केली होती. हरीओम पाईप इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO चा आकार 130 कोटी रुपये होता. हा IPO जवळजवळ 8 पट ओव्हरसबस्क्राइब झाला होता.
2007 मध्ये स्थापन झालेल्या हरिओम पाइप या हैदराबाद स्थित कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये माइल्ड स्टील बिलेट्स, पाईप्स आणि ट्यूब्स, हॉट रोल्ड कॉइल्स आणि स्कॅफोल्डिंग सिस्टम्सचा समावेश होतो. ही कंपनी गृहनिर्माण, यांसारख्या विविध अंतिम-वापर उद्योगांमध्ये व्यापार करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी पायाभूत सेवा सुविधा,कृषी, ऑटोमोटिव्ह, सौर, बांधकाम आणि अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याचे काम करते. सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात 29 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी सप्टेंबर 2021 या तिमाहीत कंपनीने 7.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर सप्टेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 9.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Hariom Pipes Industries Share Price Return on investment on 29 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार