22 November 2024 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Brightcom Group Share Price | बापरे! गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारा शेअर 73% स्वस्त, फक्त 28 रुपयांवर, खरेदी करावा?

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील एका स्टॉकने या वर्षी खराब कामगिरी केली आहे. या कंपनीच्या स्टॉकने 2021 या वर्षात आपल्या शेअर धारकांना 2,500 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2022 मध्ये सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये या कंपनीचे शेअर्स आघाडीवर आहेत. आपण ज्या कंपनीच्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, “ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड”. दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)

एका वर्षात शेअर्स 73 टक्के घसरले :
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांच्या पोर्टफोलिओ मध्ये सामील असलेल्या या शेअर्सची किंमत 2022 या वर्षात 73 टक्के घसरले आहेत. S&P BSE 500 निर्देशांकात सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या स्टॉक लिस्टमध्ये ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील झाले आहेत. 2022 या वर्षात हा स्टॉक 102.75 रुपये किमतीवरूम 28 रुपयांपर्यंत खाली पडला आहे. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.19 टक्के वाढीसह 29.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या वर्षी ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. या कंपनीचे काही खुलासे आणि आर्थिक व्यवहार गुंतवणूकदारांसाठी ” हानिकारक ” असल्याची चिंता शेअर बाजार नियामक सेबीने व्यक्त केली, आणि या शेअरला उतरती कळा लागली.

गुंतवणुकदारांचे प्रचंड नुकसान :
ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 1.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. विशेषत : कंपनीच्या किरकोळ गुंतवणूकदाराना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने मागील वर्षी ब्राइटकॉम कंपनीच्या आर्थिक बाबींचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी Deloitte Touche Tohmatsu India LLP या कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. ” सेबीने वेगाने पुढे जाणे आणि त्यांची तपास यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे ” असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले होते.

शंकर शर्मा यांची गुंतवणूक :
ब्राइटकॉम कंपनीच्या जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाही शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्या पोर्टफोलिओमध्ये ब्राइटकॉम कंपनीचे 2.50 कोटी शेअर्स होल्ड आहेत. कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या 1.24 टक्के शेअर्स शंकर शर्मा यांच्याकडे आहे.

Brightcom Group Share Price

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price has fallen down hugely check details 30 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x