19 April 2025 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

IRCTC Online Ticket Booking | ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करता? आधी हे काम करा अन्यथा बुकिंग अशक्य होईल

IRCTC Online Ticket Booking

IRCTC Online Ticket Booking | आजकाल रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन बुकिंग करतात. पण तुम्हाला आठवतंय का, तुम्ही रेल्वेचं तिकीट ऑनलाईन बुक करण्याची शेवटची वेळ कधी होती? आठवत नसेल तर ही बातमी नीट वाचा. 2022 मध्ये जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, आयआरसीटीसीचे 3 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. अशा परिस्थितीत आयआरसीटीसीने केलेल्या बदलांची माहिती सर्वांना असणं गरजेचं आहे.

४० लाख वापरकर्त्यांनी अकाउंटची पडताळणी केली नाही
आयआरसीटीसीने अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केला होता. नव्या नियमानुसार युजर्सना तिकीट बुक करण्यापूर्वी त्यांच्या अकाउंटची पडताळणी करणं आवश्यक आहे. परंतु, सुमारे ४० लाख युजर्सनी अद्याप आपले अकाउंट व्हेरिफाय केलेले नाही. जे युजर्स अकाउंट व्हेरिफाय करणार नाहीत, त्यांना ऑनलाइन तिकीट बुक करण्यात अडचणी येणार आहेत.

लवकरात लवकर व्हेरिफाय करा
आयआरसीटीसीने जारी केलेल्या नियमांनुसार, युजर्सने ऑनलाईन तिकीट बुक करण्यापूर्वी मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीची पडताळणी करणे आवश्यक आहे. कोविड-19 महामारी सुरू झाल्यानंतर अनेक महिने ज्या प्रवाशांनी वेबसाईट किंवा अॅपद्वारे तिकीट बुक केले नाही अशा प्रवाशांना आयआरसीटीसीने केलेला बदल लागू होणार आहे. जर तुम्ही अद्याप तुमच्या खात्याची पडताळणी केली नसेल, तर लवकरच पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा. हे झाल्यानंतर तिकीट बुकिंगमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरं जावं लागणार नाही. जाणून घेऊयात पडताळणीची प्रक्रिया.

मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन
* आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटवर जा आणि सत्यापन विंडोवर क्लिक करा
* आता तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.
* दोन्ही माहिती टाकल्यानंतर व्हेरिफाय बटणावर क्लिक करा.
* इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल, तो टाका आणि मोबाइल नंबर व्हेरिफाय करा.
* ईमेल आयडीवर मिळालेला कोड टाकल्यानंतर तुमचा मेल आयडीही व्हेरिफाय होईल.
* ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही ट्रेनसाठी ऑनलाइन तिकीट बुक करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IRCTC Online Ticket Booking rule account KYC check details on 01 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IRCTC Online Ticket Booking(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या